29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रशालेय अभ्यासक्रमातून धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही : वर्षा गायकवाड

शालेय अभ्यासक्रमातून धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही : वर्षा गायकवाड

टीम लय भारी 

मुंबई: शालेय शिक्षणात भगवद्गीता व संत साहित्यांचा समावेश करावा अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुशार भोसले यांनी राज्य सरकारकडे केली आहे. मात्र ही मागणी मान्य करता येणार नाही, असे वर्षां गायकवाड यांनी म्हटले आहे. शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कोणत्याही धर्माचे शिक्षण विद्यार्थ्यांना देता येणार नाही. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण झाले पाहिजे असंही त्यांनी म्हटले आहे.

गुजरात सरकारने शाळांमध्ये यंदाच्या शालेय सत्र  २०२२-२३ पासून श्रीमद भगवद् गीताचा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे. आपल्या शेजारच्या राज्यात शाळांमध्ये धर्मिक शिक्षण दिले जाणार आहे. मग आपल्या राज्यातही असे शिक्षण का नाही? असा सवाल   भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुशार भोसले केला आहे.

मात्र या मागणीवर शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्यात यावा ही भाजपची गायकवाड यांनी फेटाळून लावली. या अशा मागण्यामुळे केवळ राजकारण होतं अशीही टीका त्यांनी भाजपवर केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी