29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयमाढ्याच्या जागेसाठी शरद पवारांच्या मनातील उमेदवार कोण?

माढ्याच्या जागेसाठी शरद पवारांच्या मनातील उमेदवार कोण?

लोकसभा निवडणुकीचं (Lok sabha election) बिगुल वाजल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. अशातच राज्यातील अनेक मतदारसंघात प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळणार आहे. यापैकी एक म्हणजे, माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Lok Sabha Constituency). गेल्या अनेक दिवसांपासून माढ्यात उमेदवारीचा तिढा कायम आहे. भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहिर केल्याने राजकीय नाट्य सुरु झालं आहे. तर दुसरीकडं मविआ (maha vikas aghadi ) कोणाला मैदानात उतरवणार? याबाबत अजून निर्णय झालेला नाही. अशातच शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या मनातील उमेदवाराचं नाव जाहिर केलं आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी माढा लोकसभेसंदर्भात वैयक्तिक मत मांडलं आहे. त्यांनी सुचवलेल्या नावामुळं माढा मतदारसंघातील राजकारणाला नवं वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत शरद पवार जरा स्पष्टच बोलले

काय म्हणाले शरद पवार?

माढ्याची जागा महादेव जानकर यांनी लढावी, ही माझी वैयक्तीक मागणी आहे. मात्र सगळ्यांनी ऐकली पाहिजे. ज्योती मेटे यांच्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही. आमच्याकडे आणखी लोक येतील, महायुतीची जागा निश्चित झाल्यावर आणखी माणसं येतील, असं शरद पवार म्हणाले आहेत.

केजरीवाल जेलमधूनच सरकार चालवणार? कायदा काय सांगतो?

दोनदिवसांपूर्वी, महादेव जानकर आणि शरद पवार यांची भेट झाली होती. यादोघांच्या तब्बल १ तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान नेमके काय ठरले? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण जानकर यांनी पवारांसोबतच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला होता.

काय म्हणाले होते जानकर?

“इंतजार का फल मीठा होता है. शरद पवार राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. माढा मतदारसंघातील मतदानाला अजून अवधी असल्यामुळे कशी प्यादी सरकतात? त्या दृष्टीने आमची योजना सुरू आहे. त्यामुळे जनतेचा आशीर्वादच अंतिम असून याबाबत आता बोलणे योग्य नाही.

केजरीवालांच्या अटकेनंतर शरद पवारांचे मोठं वक्तव्य…

माढा आणि परभणी या दोन्ही मतदारसंघांतील शेतकऱ्यांपासून ते नेत्यांपर्यंत आणि शिक्षकांपासून ते पत्रकारांपर्यंत दररोज जवळपास एक हजार फोन येतात. आम्ही महाविकास आघाडीकडे तीन जागा मागितल्या होत्या. मात्र, तीनपैकी दोन मिळाव्यात, अशी आमची मागणी असल्याचे जानकरांनी सांगितले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी