ठाकरे विरूध्द ठाकरे, मुंडे विरूध्द मुंडे, पवार विरूध्द पवार, निंबाळकरांच्याविरूध्द निंबाळकर, भोसलें विरूध्द भोसले इत्यादी, भाजपाच्या गुजराथ धार्जीन्या नेत्यांनी मराठी नेत्यांनाच एकामेकाविरूध्द लढवून महाराष्ट्राची वाट लावली ! मी करीत असलेल्या कामाची भाजपा अश्रीत, लाभार्थी, लाचार राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी धुळेकर जनतेत जागृती केल्याबद्दल मनपूर्वक आभार ! मला विरोध करण्याचा कार्यक्रम थांबवून माझे नुकसान करू नका !आज तुकाराम महाराज म्हणाले असते, ‘निंदकाचे गावी, वस्तीत जावे’ असे टोल्यावर टोले लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांना एका पत्रकाच्या माध्यमातून लगावले आहेत. (Dhule: Former MLA Anil Gote slams Ajit Pawar faction )
आज गुजराथ धार्जीन्या महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठरवून योजनाबध्द कट-कारस्थान करून महाराष्ट्राच्याच नव्हे तर, देशाच्या राजकारणातदबदबा असलेली मूलतः जन्माने मराठी असलेल्या नेत्यांची आघाडीची घराणी बेमालूमपणे संपवून टाकली आहे. ‘फोडा आणि राज्य करा’ (Divide and Rule) या वृत्तीने गोऱ्या कातडीच्या इंग्रजांनी १५० वर्ष देशाला गुलामगिरीत सडवले, गोऱ्या इंग्रजांची काळी अवलाद सत्तेत आली. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणांत सर्वात मोठे राजकीय घराणे हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेचे फोडले, आता महाराष्ट्राच्या येत्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे, शरद पवार, ओबीसींचे नेते स्व. गोपीनाथ मुंडे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वशंज भोसले, शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांचा वारसा असलेले निंबाळकर घराणे, अशी आपापसात लढत झालीच पाहिजे. अशी कुटील निती भाजपच्या अश्रीत गुजराथ नेत्यांनी अवलंबली आहे. मागील विधानसभेच्या निवडणुकीत मुंडे विरूध्द मुंडे, लढवून स्व. गोपीनाथ मुंडे यांची कन्या सौ. पंकजाताई मुंडे विरूध्द, मुंडे साहेबांचे सख्खे पुतणे धनंजय मुंडे यांच्यामध्ये लढत लावली. एवढेच नव्हे तर, भाजपमधील जातीय नेत्यांनी मुंडेना आर्थिक पाठबळही मिळवून दिले. २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना ” सत्तेतून नव्हे तर, देशातून हाकलून दिले पाहिजे” अशी वल्गणा करणारे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी केली. ‘आम्ही राजकारण सोडून देवू पण, नात्यात अंतर येवू देणार नाही. असे सांगणाऱ्या हिंदूहृद्यसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवंतपणीच ठाकरे विरूध्द ठाकरे, अशी ल लावून, ठाकरेंच्या घराण्यात सत्तासंघर्ष निर्माण केला. समस्त मराठा समाजा 2 अभिमान आणि गर्व वाटावा, असे महाराष्ट्राचे सुपुत्र शरद पवार यांच्या हयातीतच त्यांचे पुतणे अजित पवार यांना त्यांच्याविरूध्द लढाईत उतरवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले त्यांचे चुलत भाऊ शिवेंद्रराजे भोसले यांच्यात घरातच साताऱ्यामध्ये भांडण लावले. संभाजी राजेंच्या मातोश्री सईबाई निंबाळकर यांच्या घराण्यात निंबाळकर विरूध्द निंबाळकर तर, अकलूज मधील मोहिते घराण्यात मोहिते विरूध्द मोहिते असा संघर्ष जन्माला घातला. गुजराथ धार्जीन्या भाजपने महाराष्ट्रातील बहुजन समाज कुंटूबांची अक्षरशः वाताहत लावली आहे. आश्चर्य असे की, सत्तेची सर्व पदे भोगलेल्या कॉग्रेसी नेत्यांना भाजपचे उच्चवर्णीय नेते आपल्या कुटूंबाची कशी वाट लावत आहेत हे कळत असूनही ते पुन्हा त्यांच्याच गळाला लागत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात आतापुरते एवढेच ठिक आहे.
धुळे शहरांत भाजप अश्रीत, लाभार्थी, लाचार राष्ट्रवादी कॉग्रेस टोळी (अजित पवार गट) च्या कथीत आंदोलनाबद्दल आपले मत व्यक्त करतांना अनिल अण्णांनी पुढे म्हटले आहे की, भाजपाच्या लाचार, लाभार्थी, आणि अश्रीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाच्या अर्धशिक्षीत व गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांनी सुरू केलेले आंदोलन) अजिबात थांबवू नये! आपण काम करत रहावे. प्रसिध्दीच्या लोभात पडू नये यासाठी फारसा प्रयत्न न करता मी काम करीत असतो. याची धुळेकर जनतेला पुरेपुर कल्पना आहे. पण महाराष्ट्रात कुठेही नसतील एवढे चांगले विरोधक माझ्या वाट्याला आलेले आहेत. याबाबतीत मी भाग्यवानच आहे. केंद्र सरकारच्या सी.आर.एफ. फंडातून सुरू असलेल्या ‘नव्या रस्त्यांच्या निर्मितीचा कार्यकम’ धुळेकर जनतेला फारसा माहित नव्हता, धुळेकरांपर्यंत पोहचविण्यात आम्ही कमी पडलो. मी तर असे म्हणेन की, शहरातील दोन टक्के लोकांना सुध्दा पांझरा नदीवरील या निधीतून बांधलेला नवा पुल, शेतकऱ्यांची जमिन, महानगपालिकाचा कचरा डेपो, कृषी महाविद्यालयाच्या जागेतून पारोळा रोडला शेतकरी पुतळ्याला मिळतो. म्हणजे नगांव बारी जवळ राहणारी व्यक्ती केवळ १० मिनीटात रेल्वे स्टेशनला पोहचेल. इतक्या जवळचा रस्ता होत असूनही सामान्य जनता अनेभिज्ञ होती. पण अर्धवट अक्कलेच्या अर्धशिक्षीत नेत्यांनी आंदोलन करून या रस्त्याची माहिती त्यांच्या पैशाने सबंध धुळे जिल्ह्यातील जनतेला कळवून दिली.
स्व. पंतगराव कदम यांनी मला एकदा प्रश्न विचारला होता की, अनिल तु एक पैसा न वाटता निवडून कसा येतो?, तुझे विरोधक काय करतात? मी त्यांना दिलेले उत्तर जसेच्या तसे विहित करीत आहे. माझे शत्रू महामुर्ख आहेत, त्यांच्या मुर्खपणावर माझा जास्त विश्वास आहे’ त्यावेळी पतंगराव म्हणाले शहाणा असेल तर, मी त्यांना सांगितले की, ‘मी त्याला मुर्ख करतो’ आणि माझे काम सोपे होते. माझ्या विरोधकांच्या मुर्खपणावर विश्वास टाकूनच मी ‘सदर रस्त्यावर कचरा टाका’ असे संबंधीत अभियंत्यांना सांगितले. सहज हवेत फेकलेली टोपी विरोधकांच्या डोक्यात फिट बसली. लाचार, लाभार्थी, अश्रीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) गटाच्या नेत्यांनी त्यांच्या खर्चाने मला प्रसिध्दी मिळवून दिली. धुळेकर जनतेला मी करीत असलेल्या कामाची माहिती करून दिली, जागृती निर्माण केली. याबद्दल मी त्यांचे हृदयापासून मनपूर्वक आभार मानतो. माझी त्यांना विनंती आहे की, ‘त्यांनी माझ्या विरूध्द सुरू असलेले आंदोलन रस्ता पुर्ण होईपर्यंत अखंडपणे असेच सुरू ठेवावे’ म्हणजे, धुळेकर जनतेला कळेल तरी की मी, किती महत्वाचे बहुमोल असे काम करीत आहे. काम कुठपर्यंत आले आहे. कारण, या आंदोलनापासून किमान १०-१५ फोन तरी ‘अण्णासाहेब रस्ता कुठे आ हे विचारण्यासाठी मला येत असतात. त्यामुळे अजित पवार टोळीने त्य कार्यक्रम थांबवू नये! ही पुनश्च विनंती करतो. ४०० वर्षापुर्वी संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणाले होते ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ आज तुकाराम महाराज म्हणाले असते, ‘निंदकाचे गावी, वस्तीत जावे’ असे टोल्यावर टोले लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांना एका पत्रकाच्या माध्यमातून लगावले आहेत.