31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयशरद पवारांनी देवेंद्र फडणविसांना पाजले बाळकडू

शरद पवारांनी देवेंद्र फडणविसांना पाजले बाळकडू

टीम लय भारी

मुंबई : ‘मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते’ अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. फडणवीस यांच्या या वक्तव्याचा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. ( Sharad Pawar taunted Devendra Fadnavis )

मी चार वेळा मुख्यमंत्री होतो, पण मला ते अजून स्मरणातही नाही. देवेंद फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते, पण त्यांच्या स्मरणातूनही ते जात नाही. यापूर्वीही त्यांनी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असे वारंवार म्हटले होते, अशा शब्दांत पवार यांनी फडणवीस यांची खिल्ली उडविली.

हे लोक गांधींऐवजी सावरकांना राष्ट्रपिता बनवतील; राजनाथ सिंहांच्या वक्तव्यावरून ओवैसींचा टोला

Maratha Reservation : संभाजीराजेंनी दिला इशारा, म्हणाले…

सत्तेचा वापर हा समंजसपणे करायला हवा. लोकांसाठी, राज्याच्या विकासासाठी सत्तेचा वापर व्हायला हवा. परंतु भाजपचे नेते चुकीचे वागतात, असे पवार म्हणाले.

मी मुख्यमंत्री होतो. सत्ता गेल्यानंतर विरोधी पक्षनेताही होतो. विरोधात काम करीत असताना तळागाळात फिरणे होते. कार्यकर्ते, सामान्य जनता यांच्यासोबत बोलणे होते. त्याचा फायदा होत असतो.

आपण मुख्यमंत्री असताना जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, सचिव यांच्यामार्फत आपणाला अनेक अहवाल येत असतात. या अहवालांच्या आधारे मुख्यमंत्री निर्णय घेत असतात.

परतुं नंतर विरोधी पक्षात असल्यानंतर ज्या वेळी आपण तळागाळात गेल्यानंतर अगोदरचे अधिकाऱ्यांनी पाठविलेले अहवाल चुकीचे होते, हे लक्षात येते. मी विरोधी पक्षनेता असताना तळागाळात फिरताना फार फायदा झाल्याचे पवार यांनी सांगून फडणविसांना उपदेशाचा डोस पाजला.

आम्हालाही दिल्लीवर गेल्यावर वाटतं आपणच पंतप्रधान होणार : संजय राऊत

“Why Raid Same House 5 Times?” Sharad Pawar Alleges Misuse Of Agencies

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी