33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयशिवसेनेचे ‘गाजर’ व ‘लॉलीपॉप’ आंदोलन

शिवसेनेचे ‘गाजर’ व ‘लॉलीपॉप’ आंदोलन

टीम लय भारी

मुंबई : लोकांना खोटी आश्वासने द्यायची आणि आपला कार्यभाग साधायचा ही निती भाजप सरकारने अवलंबिली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे ( Shiv sena agitation against Modi Government ).

मोदी सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या नव्या करवाढीमुळे पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ होणार आहे. एका बाजूला मोदी सरकार ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत आहे. दुसऱ्या बाजूला मात्र सामान्य जनतेचे जगणे मुश्कील करीत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे ( Shiv sena agitation against fuel prices ).

हे सुद्धा वाचा

क्रिकेट संघाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर चर्चा

नाना पटोलेंनी दिला विधानसभाध्यक्षपदाचा राजीनामा

गाजीपुर बॉर्डर पहुंचे संजय राउत, कहा- राकेश टिकैत की आंखों में आंसू देख नहीं रह सका

पेट्रोल पंपावर येणाऱ्या लोकांना ‘गाजर’ व ‘लॉलीपॉप’ वाटप करून हे आंदोलन करण्यात येणार आहे ( Shiv sena will circulate carrot and lollipop ). दादर येथील शिवसेना भवन नजिकच्या हिंदूस्थान पेट्रोलपंपावर हे आंदोलन करण्यात येणार आहे.

शिवसेनेच्या शाखा क्रमांक 191 च्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. शिवसेनेच्या उपनेत्या व नगरसेविका विशाखा राऊत आणि शाखाप्रमुख अजित कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता आंदोलन होईल.

Shivsena agitation against Modi Government
Shivsena – BJP मधील दरी वाढतच चालली आहे

लय भारी बातम्या ट्विटरवरही वाचा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी