यंदाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार याची चुणूक सोमवारी पहायला मिळाली. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, सदस्य मनीषा कायंदे आणि बिपल्व बाजोरिया यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अपात्रतेसाठी नोटीस बजावली आहे. या तिघांनीही उद्धव ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ही नोटीस देण्यात आली आहे. विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे नोटीस देण्यात आली आहे. विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे ही नोटीस देण्यात आली आहे. कामकाज सुरू झाल्यावर महाराष्ट्र गीत होताच जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर निलम गोऱ्हे यांनी गटनेत्यांच्या बैठकीला उपस्थित असता, तर तुमचे म्हणणे येथे लगेच ग्राह्य धरले असते. तुम्हाला माझ्यावरदेखील अविश्वास आणायचा असेल, तर तुम्ही आणू शकता’, असे जयंत पाटील यांना सांगितले. दरम्यान, या नोटिसमुळे गोऱ्हे, कायंदे आणि बाजोरियांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस मंत्र्यांचा परिचय करून द्यायला उभे झाले असता, त्यालाही विरोध करण्यात आला. जयंत पाटलांचे ऐकून घेतले आहे. आता त्यांचेही ऐकू द्या, असे निलम गोऱ्हेनी सांगितले. सभापतींवर असा केव्हाही आक्षेप घेता येणार नाही. त्याचे काही नियम आहेत. शोक प्रस्ताव महत्वाचा आहे. सभागृहाला अशा प्रकारे वेठीस धरता येणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मंत्र्यांचा परिचय करून दिल्याशिवाय परिषदेचे कामकाज सुरू होऊच शकत नाही, असे म्हणत फडणवीसांनी परिचयाला सुरुवात केली. अजित अनंतराव पवार – उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन, छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, दिलिप वळसे पाटील सहकारी मंत्री, हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण मंत्री विशेष सहाय्य, धनंजय मुंडे – कृषिमंत्री, धर्मरावबाबा आत्राम – अन्न व औषध प्रशासन मंत्री, संजय बमसोडे- क्रीडा युवक कल्याण व बंदरे मंत्री, अदिती तटकरे – महिला व बालविकास मंत्री, अनिल पाटील मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री. असा परिचय झाल्यानंतर पुन्हा जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. त्यावर असा केव्हाही उठून आक्षेप घेता येणार नाही, त्याचेही काही नियम आहे. त्यामुळे नियमबाह्य कामकाज आपल्याला चालवता येणार नाही, असे फडणवीसांनी म्हणताच सभागृहात गदारोळ सुरू झाला. नंतर निलम गोऱ्हे बोलत असतानाही गदारोळ सुरूच होता. त्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
हे सुद्धा वाचा:
अजित पवार यांना 36 आमदारांची जुळवाजुळव करणे झाले कठीण, अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला
विरोधी पक्षांची बंगळुर येथे 17, 18 जुलैला बैठक, 24 पक्ष राहणार उपस्थित
अपुऱ्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने चर्चा करण्याची काँग्रेसची मागणी
यंदा शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले, त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही कॉंग्रेससह शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपली शस्त्रे पाजळली आहेत. विविध संसदीय आयुधांचा वापर करण्याचे ठरवण्यात आले आले आहे. त्यामुळे मंगळवारी विरोधक कशा पद्धतीने सत्ताधारी मंडळींना कैचीत घेतात हे लवकरच कळणार आहे.