34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयशरद पवारांच्या मनातलं आम्ही काय सांगावं; प्रफुल पटेलांची अगतिकता

शरद पवारांच्या मनातलं आम्ही काय सांगावं; प्रफुल पटेलांची अगतिकता

आज पासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले. काल अधिवेशनाच्या आदल्यादिवशी अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाचे नऊ मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ, खासदार सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची यशवंतराव चव्हाण सेंटवरवर भेट घेतली. यावेळी पवारांनी कोणतीच प्रतिक्रीया दिली नाही. त्यानंतर आज देखील अधिवेशनाचे कामकाज आटोपताच अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार शरद पवारांच्या भेटीला यशवंतराव चव्हाण सेंटवरवर आले होते. या भेटीनंतर प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, पक्ष एकसंध रहावा अशी विनंती त्यांना केली. त्यांच्या मनात काय आहे हे मी सांगू शकत नाही. त्यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नसल्याचे देखील पटेल म्हणाले.

पंधारा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा भूकंप झाला. अजित पवार यांच्यासह पक्षाच्या नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादीत फुट पडली. त्यानंतर अजित पवार गटाने पक्ष आणि पक्षचिन्हावर देखील दावा केला आहे. याच घडामोडीमध्ये अजित पवार यांनी शरद पवारांचे आता वय झाले आहे, त्यांनी निवृत्त व्हावे असे देखील त्यांनी त्यांच्या मेळाव्यात बोलताना म्हटले होते. त्यानंतर पवारांनी येवल्याच्या सभेत वयावर जाऊ नका असा इशारा दिला होता.

बहुसंख्य आमदार अजित पवार यांच्या बाजूने असल्याचा दावा केला जात असला तरी नेमके किती आमदार अजित पवार यांच्या बाजूने आहेत याचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. आज पावसाळी अधिवेशनात हे चित्र स्पष्ट होईल असे वाटत होते. मात्र अनेक आमदार आज पहिल्या दिवशी गैरहजर राहिले त्यामुळे आज देखील हे चित्र स्पष्ट झालेले नाही. आज अधिवेशना दरम्यान राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे आमदार सभागृहात वेगवेगळे बसले. अजित पवार गटाचे जे आमदार उपस्थित होते ते सत्ताधारी पक्षाच्या बाजूला बसले तर शरद पवार गटाचे आमदार विरोधी पक्षाच्या बाजूला बसलेले दिसले.

अजित पवार यांना ३६ आमदारांची गरज आहे, मात्र अजून तरी अजित पवार यांच्याकडे ३६ आमदार आहेत हे चित्र स्पष्ट झालेले नाही. काही आमदार अजूनही व्दिधा मनस्थितीत असल्याचे दिसत आहे. अपात्रतेच्या कचाट्यातून वाचण्यासाठी अजित पवार यांच्या गटाकडे ३६ आमदार आवश्यक आहेत. अशात काल आणि आज अजित पवार गटाने पवारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांच्या गाटाने आम्हाला मार्गदर्शन करावे, झालेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असे शरद पवार यांना काल म्हटले होते. पक्ष एकसंध राखण्यासाठी पवारांकडे मनधरणी करण्याचा प्रयत्न अजित पवार गट करत असला तरी शरद पवार मात्र आपली भूमिका बदलण्यास तयार नसल्याचे दिसत आहे.

आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज आटोपल्यानंतर अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेले. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले. आम्ही सर्वजण शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. काल अजित पवार यांच्यानेतृत्वात मंत्री भेटले. आज अधिवेशन असल्याने आमदार मुंबईत आले आहेत. त्यांना शरद पवारांचा आशीर्वाद मागण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही आज भेटीसाठी आलो होतो.

हे सुद्धा वाचा 

गोऱ्हे, कायंदे आणि बाजोरियांच्या अडचणीत वाढ; शिवसेना उद्धव ठाकरे गटाने बजावली अपात्रतेची नोटीस

अजित पवार यांना 36 आमदारांची जुळवाजुळव करणे झाले कठीण, अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला

विरोधी पक्षांची बंगळुर येथे 17, 18 जुलैला बैठक, 24 पक्ष राहणार उपस्थित  

पुढे बोलताना पटेल म्हणाले, शरद पवारांची भेट घेऊन सर्वांनी शरद पवार यांचा आशिर्वाद घेतला. आज देखील पक्ष एकसंध राहण्याबाबत त्यांच्याकडे विनती केली. पवारांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले, मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. आता त्यांच्या मनात काय आहे, हे मी काही सांगू शकत नाही, असे प्रफुल पटेल म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी