31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयशिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे, आता शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका; राऊतांचा...

शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे, आता शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका; राऊतांचा भाजपला खोचक टोला

टीम लय भारी

मुंबई :- भाजपच्या काही लोकांनी काल शिवसेना भवनासमोर राडा करण्याचा प्रयत्न केला. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला असून मराठी अस्मितेचे प्रतिक असणाऱ्या शिवसेना भवनावर चाल केली तर शिवसैनिक (Shiv Sainik) आणि मराठी माणूस शांत बसेल का? अशी विचारणा केली आहे. राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी (Shiv Sainik) शिवप्रसाद (Shivprasad) दिला आहे. हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा खोचक टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे (Let it be limited to prasada, dont let the time come to give Shivbhojan plate, Shiv Sena leader Sanjay Raut has given a sharp blow to BJP).

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या कथित जमीन गैरव्यवहारावर टीका करणाऱ्या शिवसेनेविरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी बुधवारी दादरच्या शिवसेना भवनासमोर मोर्चा काढला. यावेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसैनिकांनी (Shiv Sainik) शिवप्रसाद (Shivprasad) दिला आहे, आता शिवभोजन थाळी (Shiva food plate) देण्याची वेळ आणू नका असा संजय राऊतांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे (Shiv Sainiks have given Shiv Prasad, now dont bring time to give Shivbhojan plate, Sanjay Raut has slammed BJP).

आरक्षणावरून संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, तर उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कैकाडी समाजासाठी केंद्राकडे शिफारस, धनंजय मुंडेंची घोषणा

 

Sanjay Raut: No one has the courage to attack Sena Bhavan, those who tried to come close to it were given ‘Shiv Prasad’

“शिवसेना भवनावर हल्ला करण्याची हिंमत कोणामध्येच नाही. एक टोळका आला होता. आता तो कशासाठी आला होता आणि त्यांचा संबंध काय हे समजून घेतले पाहिजे. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक आहे. राजकीय मतभेद असू शकतात. पण ती बाळासाहेब ठाकरेंची वास्तू आहे. मराठी अस्मितेचे प्रतिक असणारी वास्तू आहे. त्याच्यावर चाल केली तर शिवसैनिक (Shiv Sainik) आणि मराठी माणूस शांत बसेल का?,” अशी विचारणा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईत प्रसारमाध्यांशी बोलताना केली आहे.

“मुळात कारण काय? राम मंदिरासंबंधी काही आरोप केले असे म्हणत असाल तर तुम्हाला लिहिता वाचता येते का? तुम्हाला शिक्षणाचा गंध आहे का? सामनात काय लिहिले आहे ते वाचा. शिवसेनेचे प्रवक्ते काय बोललेत ते ऐकून घ्या. जे आरोप झाले आहेत त्यांची चौकशी व्हावी आणि जर ते आरोप द्वेषबुद्धीने केले असतील तर आरोप करणाऱ्यांना सोडू नका असे अग्रलेखात स्पष्ट म्हटले आहे. त्याच्यावर एखाद्याला मिरच्या का झोंबाव्यात? भाजपावर कुठेही थेट आरोप केलेला नाही. भाजपाने घोटाळा केल्याचे कुठेही म्हटलेले नाही,” असे संजय राऊतांनी (Sanjay Raut) स्पष्ट केले आहे.

“ट्रस्टमध्ये भाजपाचे कार्यकर्ते आहेत का? खुलासा मागणे गुन्हा आहे का?,” अशी विचारणा संजय राऊतांनी (Sanjay Raut) यावेळी केली आहे. “ज्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांना शिवसैनिकांनी (Shiv Sainik) शिवप्रसाद (Shivprasad) दिला आहे. हा प्रसादापुरताच मर्यादित राहू द्या, त्यांना शिवभोजन थाळी (Shiva food plate) देण्याची वेळ आणू नये,” असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे (Let it be limited to prasada, dont bring time to give them a plate of Shiva food, “Sanjay Raut has warned).

प्रदीप शर्मांवरील कारवाईवर प्रतिक्रिया

“मला यायंबंधी काही माहिती नाही. कायदेशीर बाबीत आपण पडणे योग्य नाही. सरकार आमचे आहे, केंद्रीय तपास यंत्रणा वारंवार येतात आणि कारवाई करतात. यासंबंधी मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री, गृहसचिव, मुंबईचे पोलीस आयुक्त आणि जे कायदा सुव्यवस्था यातील प्रमुख आहेत तेच अधिकृतपणे बोलू शकतील. ज्या विषयाची माझ्याकडे माहिती नाही त्याबद्दल मी बोलणार नाही,” असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी