32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयस्मृती ईराणींचे पहिले पुस्तक प्रदर्शित

स्मृती ईराणींचे पहिले पुस्तक प्रदर्शित

टीम लय भारी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी या आता लेखिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. स्मृती इराणी यांचे नुकतेच एक पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लाल सलाम’ या कादंबरीच्या मार्फत इराणी या लेखिका म्हणूनही नावा रुपाला येणार आहेत(Smriti Irani’s first book is pubished).

हे पुस्तक एप्रिल 2010 मध्ये दंतेवाडा, छत्तीसगड येथे शाहिद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) 76 जवानांच्या हत्येपासून प्रेरित आहे. तसेच हे पुस्तक देशसेवेसाठी, विशेषत: नक्षलग्रस्त भागात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिसांना श्रद्धांजली आहे. हे पुस्तक २९ नोव्हेंबर रोजी बाजारात येणार आहे. वेस्टलैंड नामक कंपनीने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.

प्रीती झिंटा झाली आई, वयाच्या ४६ व्या वर्षी दिला दोन जुळ्या मुलांना जन्म

हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी अडचणीत, अटक वॉरंट जारी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Smriti Irani's first book Lal Salaam is pubished
स्मृती ईराणी

‘लाल सलाम’ ही एक युवा अधिकारी विक्रम प्रताप सिंग यांची कथा आहे. या कथेत विक्रम प्रताप सिंग हे कसे राजनीती आणि भ्रष्टाचार यांनी व्यस्त असलेल्या यंत्रणेवर कसे मात करतात. यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

बुलढाण्यात विष घेतलेल्या एसटी कामगाराचा मृत्यू

अपनी पहली किताब ‘लाल सलाम’ के साथ लेखक बनीं केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी

ईराणी यांनी आपल्या या पुस्तकासंदर्भात सांगितले की, ” ही कथा माझ्या मनात वारंवार फिरत राहायची. शेवटी मी स्वतःला ते लिहिण्यापासून रोखू शकली नाही. मला आशा आहे की वाचकांना ते आवडेल आणि काहीतरी समजेल ज्याबद्दल फारच कमी लिहिले गेले आहे.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी