34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयशेतकऱ्यांना चिरडणे म्हणजे सत्तेची मस्ती, बाकी काही नाही; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

शेतकऱ्यांना चिरडणे म्हणजे सत्तेची मस्ती, बाकी काही नाही; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

टीम लय भारी

मुंबई : “ही सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही. तुम्ही तो शेतकऱ्यांना चिरडण्याचा व्हिडीओ पाहा, तुम्हाला त्यात माणुसकी दिसते आहे का? असा सवाल ऱाष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. पत्रकार असो, समाजकारणी असो पण सर्वात आधी आपण माणसं आहोत. हे चुकीचं आहे, क्रुरता आहे हे तुम्हाला वाटत नाही का? कुणाचंही सरकार असो, उत्तर प्रदेशमध्ये जी कृती झाली ती निंदाजनक आहे. केंद्र सरकारने भारताच्या नागरिकांना, शेतकऱ्यांना न्याय द्यावा,” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे (Supriya Sule raised question on Lakhimpur Kheri incident).

महाविकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. लखीमपूर खेरी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७० किमी अंतरावर टिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी चार शेतकरी होते.

शेतकरी घरदार सोडून रस्त्यावर बसलाय मात्र कुणी ढुंकून पाहत नाही, शरद पवारांचा हल्लाबोल

केवळ बोटावर मोजण्याएवढ्या भाजपाच्या व्यापारी संघटनांचा महाराष्ट्र बंदला विरोध : राष्ट्रवादी काँग्रेस

दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्याने बंदला प्रतिसाद मिळत आहे. या बंदला आधी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र, नंतर नरमाईची भूमिका घेत बंदला पाठिंबा असल्याचे व्यापाऱ्यांनी जाहीर केले आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील भाष्य केले आहे. बंद मोडून काढण्याची भाषणा करणारे मूर्ख आहेत, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

शरद पवार लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावर संतापले, आणि म्हणाले…

Thane: NCP leader Supriya Sule attends Maha aarti at Tulja Bhavani temple

“शेतकऱ्यांचा रोष आणि संताप समजून घेण्याची गरज आहे. बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख आहेत. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडणाऱी जीप महाराष्ट्रात असेल तर आणावी रस्त्यावर, असं म्हणत राऊत यांनी थेट भाजपाला आव्हान दिलं आहे. लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद केलाय. बंद १०० टक्के यशस्वी आहे. किरकोळ घटना घडल्या असतील तर बंद असताना जगभरात घडतात,” असं राऊत म्हणाले आहेत. शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत असून शेतकऱ्यांना चिरडण्याच्या प्रवृत्तीविरोधात आमचा विरोध आहे. आज संपूर्ण देश महाराष्ट्राकडे पाहत आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना चिरडणे म्हणजे सत्तेची मस्ती, बाकी काही नाही; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

भाजपाकडून शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन-  जयंत पाटील

“महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि आमचे मित्र पक्ष यांच्यावतीने हा बंद आम्ही पुकारला आहे. या बंदचं कारण म्हणजे भाजप आजपर्यंत देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत होती. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. भाजपला त्यांचं राजकीय मत आग्रहाने मांडायचं आहे हे समजू शकतो, पण लखीमपूरसारखी घटना जाणीवपूर्वक केलेलं हत्याकांड आहे,” असे जयंत पाटील म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी