पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशभरातील उत्तरेकडून दक्षिणेकडची आणि पूर्वेपासून पश्चिमेकडचे विरोधक एकवटले असून त्यांनी निर्माण केलेल्या इंडिया आघाडीची बैठक मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये 31 आणि 1 सप्टेंबर मध्ये होऊ घातली आहे. या बैठकीपूर्वीच पंतप्रधानपदासाठी तीन नावे चर्चेत आले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा समावेश आहे. मात्र त्याआधीच आपकडून केजरीवाल पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान हा बैठकीत उरलेल्या तीन नावांची पंतप्रधान पदासाठी चाचपणी होणार आहे.
राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे देश पातळीवरील जनता मोदी यांच्या कारभारावर समाधानी नसल्याचे सिद्ध झाले होते. मुख्य धारेतील माध्यमांनी या यात्रेची दखल फार काही घेतली नाही. पण देश या यात्रेने ढवळून निघालेला होता, आहे. त्यामुळे मोदी विरोधात देश पातळीवर विरोधकांची आघाडी निर्माण झाल्यास केंद्रातील सरकार बदलू शकते असा विचार शरद पवार आणि बिहारचे मुकीमयांत्रि नितीश कुमार यांनी बोलून दाखवल्यावर देशभरातील विरोधक इंडिया या बॅनरखाली एकवटले. आणि बिहार, बंगलोर येथे झालेल्या बैठकीच्या यशानंतर मोदी यांनी एनडीएची मोट बांधली. इंडियाच्या दोन बैठकांना मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता, मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यामुळेच की काय मंगळवारपासून इंडिया आघाडीत सहभागी झालेले नेते मंडळी मुंबईत दाखल झाले आहेत. उद्यापासून ही बैठक सुरू होणार आहे, असे असताना आम आदमी पक्षाकडून अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान पदाचे उमेदवार व्हावे, अशी इच्छा व्यक्त करण्यात आली.
हे सुद्धा वाचा
बॉलिवूडच्या कलाकारांनीही साजरी केली रक्षाबंधन!
आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ‘त्यांना’ भाचीचे अखेरचे दर्शन झाले
ठाण्यातला असाही रक्षाबंधन तुम्ही पहिला का?
‘आप’च्या प्रवक्त्या प्रियांका कक्कड यांनी अरविंद केजरीवाल हे पंतप्रधानपदाचे दावेदावर असावे, असं म्हटलं होतं. याव आपच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना केजरीवाल पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं म्हटलं. याआधी पंतप्रधानपदासाठी उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांचे नाव देखील आले आहे. ‘आप’कडून केजरीवाल पंतप्रधान पदाचे उमेदवार नसल्याचं स्पष्ट केलं. तर उद्धव ठाकरे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी देखील लगेच पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी जातो, असं म्हणत पत्रकारांचीच फिरकी घेतली. समाजवादी पक्षाच्या नेत्या जुही सिंह यांनी म्हटलं की, विरोधकांच्या आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार अखिलेश यादव असावे. सपाचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांना पंतप्रधानपदी पाहतो. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या सर्व क्षमता असल्याचंही म्हटलं. त्यामुळे एकंदरीतच पंतप्रधानपदासाठी आता हळूहळू नावं समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
उद्या आणि परवा मुंबईत ही बैठक होत आहे त्या अनुषंगाने बुधवार इंडियाच्या नेते मंडळींची पत्रकार परिषद झाले. ही पत्रकार परिषद पार पडल्यानंतर विरोधकातील काही जणानी आपलाच नेता पंतप्रधान पाहिजे अशी मनीषा व्यक्त केली आहे. त्यामुळे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची चाचपणी होणार आहे. त्याकडे देशवासीयांचे लक्ष लागले आहे.