30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरे शिवसैनिकांना देणार कानमंत्र, वर्धापन दिनानिमित्तच्या भाषणाकडे साऱ्यांचे लक्ष

उद्धव ठाकरे शिवसैनिकांना देणार कानमंत्र, वर्धापन दिनानिमित्तच्या भाषणाकडे साऱ्यांचे लक्ष

टीम लय भारी

मुंबई :- १९ जून १९६६, रोजी शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापन केली. शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापन दिन आहे. याच पार्श्भूमीवर, यंदाही वर्धापनदिन हा साजरा केला जाणार आहे. पण कोरोनाचे संकट अजून ओसरले नाही; त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी अत्यंत साध्या स्वरूपात, सुरक्षितता बाळगून साजरा केला जाणार आहे. उद्धव ठाकरे शिवसैनिकांना देणार कानमंत्र, वर्धापन दिनानिमित्तच्या भाषणाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे (Uddhav Thackeray to give ear mantra to Shiv Sainiks, everyone attention is focused on anniversary speech).

स्वतः शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) व अनेक महत्त्वाचे नेते ऑनलाईन कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसैनिकांशी (Shiv Sainik) संवाद साधणार आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी शिवसेना वर्धापन दिन सोहळा आज  सायंकाळी ६.३० वाजता व्हर्च्युअल स्वरूपात होईल. तसेच यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटे सोबत काही महत्वाच्या गोष्टींवर बोलणार आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनाचा हा दुसरा वर्धापन दिन आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आज नेमके काय बोलणार आहेत याकडे सर्वांचचे लक्ष लागल आहे.

विलासराव देशमुख, बाळासाहेब थोरात आणि कोकरू!

अंतिम सामन्याच्या कसोटीला राखीव दिवसाची गरज …

Coronavirus: India reports 60,753 new cases, with active infections at lowest in 74 days

कोरोनामुळे वर्षभरापासून रखडलेल्या काही महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणूका होण्याची शक्यता, तसेच फेब्रुवारी महिन्यात मुंबई, ठाण्यासह महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणुकांसाठी शिवसेनची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आगामी सर्व निवडणूका सबोत लढवण्याचे आवाहन महाविकास आघाडीला केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तिन्ही पक्ष सोबत निवडणूका लढवू अशी भूमिका मांडली होती, परंतु काँग्रेसने आगामी निवडणूका स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एकंदरीत ठाकरे महायुतीसोबतच्या आगामी वाटचाली बाबत काय भूमिका असेल याबाबत बोलाण्याची शक्यता आहे.

मराठी माणसाच्या अस्मितेसाठी, न्याय हक्कासाठी स्थापन केलेल्या शिवसेनेने गेल्या ५५ वर्षात महाराष्ट्रासह देशभरात आपला दबदबा निर्माण केला आहे. गेल्या साडेपाच दशकांमध्ये शिवसेनेने एक प्रमुख प्रादेशिक पक्ष म्हणून राजकारणात आपला ठसा उमटवला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या पक्षाचा पाय महाराष्ट्रात भक्कम केला. राजकारणी डावपेच, सर्जनशीलता, रोखठोक भाषणे यांनी बाळासाहेबांना मराठी माणसाच्या मनात मोठे स्थान दिले आहे. शिवसेनेचा वर्धापन दिन हा दरवर्षी मोठ्या थाटाने, उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शिवसैनिक (Shiv Sainik) यासाठी उपस्थित असतात. महाविकास आघाडी असताना, तसेच स्वतः पक्षप्रमुख हे मुख्यमंत्री असतानाचा हा सलग दुसऱ्या वर्षीचा वर्धापन दिन आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी