31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयविधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक, १ डिसेंबरला होणार मतदान

विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक, १ डिसेंबरला होणार मतदान

टीम लय भारी

मुंबई :  ‘कोरोना’मुळे लांबलेल्या विधानपरिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका घेण्यास केंद्रीय हिरवा कंदील दाखविला आहे. या मतदारसंघांतील एकूण पाच जागांसाठी येत्या १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर ७ डिसेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल ( Vidhanparishad election on 1st December ).

निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केला आहे. औरंगाबाद, पुणे व नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघातील तीन जागा, तर अमरावती व पुणे विभागीतल शिक्षक मतदारसंघातील दोन जागांसाठी या निवडणुका घेण्यात येणार आहेत ( VidhanParishad election for 5 seats in Maharashtra ) .

हे सुद्धा वाचा

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त

Urmila Matondkar : शिवसेनेच्या ऑफरला उर्मिला मातोंडकर यांचा होकार, शिवसेनेच्या कोट्यातून विधान परिषदेवर

या पाच जागांवर अनुक्रमे सतीश चव्हाण, चंद्रकांतदादा पाटील, अनिल सोले, श्रीकांत देशपांडे व दत्तात्रय सावंत हे पाच आमदार कार्यरत होते. त्यांचा कार्यकाळ १९ जुलै रोजी संपला आहे, तर चंद्रकांत पाटील हे विधानसभेवर यापूर्वीच निवडून आले होते. त्यामुळे त्यांची विधानपरिषदेतील जागाही यापूर्वीच रिक्त झालेली आहे.

या जागांचा कार्यकाळ संपून चार महिने ओलांडले आहेत. परंतु ‘कोरोना’ आपत्तीमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता मात्र १ डिसेंबर रोजी या निवडणुका होतील, अशी अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केली आहे.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी