30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रVinayak Raut : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत भर बैठकीत मास्क काढून शिंकले!

Vinayak Raut : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत भर बैठकीत मास्क काढून शिंकले!

टीम लय भारी

कणकवली : महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) सिंधुदुर्गच्या दौ-यावर होते. यावेळी एका बैठकीत त्यांच्यासोबत शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) देखील होते. महत्वाचे म्हणजे दोघांनीही मास्क घातले होते. सत्तार बोलत असताना बाजुला बसलेल्या विनायक राऊतांना शिंक आली. तोंडा, नाकावाटे कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून नागरिक मास्क घालतात. मात्र, राऊत यांनी शिंक येताच नेहमीच्या सवयीप्रमाणे हात समोर धरला. यावेळी त्यांनी शिंक येताना मास्क काढला आणि नाका-तोंडासमोर हात धरला. शिंकताना पुढ्यात ठेवलेल्या बिस्किटांवर जोरदार फवारा मारत त्यांनी पुन्हा मास्क घातला.

नेमका हाच व्हीडिओ भाजपचे युवा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी पोस्ट करत निशाणा साधला आहे. ‘हे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार! एकदा त्यांना विचारा त्यांनी मास्क का घातला आहे? अशा मुर्खांपासून माझ्या कोकणाला आता देवानेच वाचवावे’ असा टोला लगावला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी