30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रसत्ता स्थापनेची आम्ही तयारी केली आहे, पण पहिली संधी भाजपला द्या :...

सत्ता स्थापनेची आम्ही तयारी केली आहे, पण पहिली संधी भाजपला द्या : संजय राऊत

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : सत्ता स्थापनेची आम्ही सुद्धा तयारी केली आहे, पण पहिली संधी भाजपला द्या. मात्र भाजप काळजीवाहू सरकार म्हणून सत्तेत फार काळ थांबत आहे, व सूत्रे हलवित आहे. राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा डाव आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला.

भाजपचे नेते वारंवार सांगत आहेत की, आम्ही शिवसेनेच्या सोबतीनेच सरकार स्थापन करणार आहोत. असे असेल तर मग निवडणुकीपूर्वी जे ठरले होते. त्यानुसार सेनेसोबत सत्ता स्थापन करावी, असे सांगत शिवसेना अद्यापही अडिच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम असल्याचा पुनरूच्चार राऊत यांनी केला.

उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी काल संभाजी भिडे मातोश्रीवर आले होते. पण उद्धव ठाकरे घरी नसल्याने ही भेट होऊ शकली नाही. त्या संदर्भातही राऊत यांनी भिडे यांच्यावर आसूड ओढला. आम्हाला मध्यस्थाची गरज नाही. उद्धव ठाकरे यांचाच हा निरोप आहे. हा विषय भाजप आणि शिवसेनेचा आहे. यात तिसऱ्यांनी मध्ये पडण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत राऊत यांनी भिडेंना सुनावले.

महाराष्ट्र दिल्लीसमोर कधी झुकणार नाही. शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले आहे की, महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही. ‘आम्ही रणांगणातून पळून जाणार नाही, आम्ही कोणापुढे लाचार होणार नाही’ ही अटलबिहारी वाजपेयींची कविता आम्हाला आठवते. महाराष्ट्र आमचा आहे. शिवाजी महाराजांपासून बाळासाहेब ठाकरेपर्यंत महाराष्ट्राने वारंवार स्वाभिमान दाखवून दिलेला आहे. कर्नाटक पॅटर्न आणण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात कर्नाटकाप्रमाणे पैसा व सत्तेचा घोडेबाजार चालणार नाही. इथे कोणताही पॅटर्न चालणार नाही. ज्यांच्याकडे बहुमत असेल, त्यांचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिसेल. काळजीवाहू मुख्यमंत्री फार काळ बसविण्याचे भाजपचे डावपेच सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देवून केव्हाच जायला पाहीजे होते. काळजीवाहू म्हणून बसायचे आणि सूत्रे हलवायचे. हा महाजनादेशाचा व संविधानाचा अपमान आहे. फडणवीस यांनी आज राजीनामा द्यायलाच हवा, असेही राऊत म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी