30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मावळत्या सरकारचा आज शेवटचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस आज आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता आहे.

नवीन सरकार स्थापन झालेले नाही, आणि जुन्या सरकारचा कार्यकाळ आज संपणार आहे. त्यामुळे तांत्रिक कारणास्तव फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने विधीमंडळ नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचीच निवड केली आहे. त्यामुळे सत्तेवर जर नव्याने भाजपचे सरकार आले तर मुख्यमंत्रीपदावर फडणवीस यांचीच पुन्हा वर्णी लागणार आहे. नरेंद्र मोदी व अमित शाह यांनीही मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांच्याच नावाला पसंती दिली आहे.

हे सुद्धा वाचा

आज नव्या सरकारचा निर्णय होणे गरजेचे, अन्यथा….

चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार राज्यपालांकडून हात हलवत परत का आले ? : संजय राऊत यांची कोपरखळी

परंतु 145 आमदारांचे संख्याबळ भाजपकडे नाही. त्यामुळे शिवसेनेच्या पाठींब्याशिवाय भाजपला सरकार स्थापन करणे केवळ अशक्यच आहे. शिवसेनेने मात्र अडिच वर्षे मुख्यमंत्रीपदासह सत्तेत अर्धा वाटा मागितला आहे. त्यामुळे भाजपचा दगडाखाली हात सापडला आहे. सत्तासंघर्षामध्ये फडणवीस यांना आता मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावे लागतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मावळत्या सरकारचा नेता या नात्याने ते आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी