31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रसहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगामाचा शुक्रवारी शुभारंभ

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगामाचा शुक्रवारी शुभारंभ

टीम लय भारी

संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याचा सन २०२१ – २०२२ या  ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ विजया दशमीच्या शुभमुहुर्तावर शुक्रवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता झाला. (Sugar Factory launches sugarcane crushing season on Friday by Sahakar Maharshi Bhausaheb Thorat )

महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात व सौ.कांचनताई बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी दिली आहे.

डॉ. त्रंबक राजदेव यांना शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार जाहीर

मुंबईत ‘बर्निंग बाइक’; पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 25 दुचाकी जळून खाक

महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सर्वाधिक भाव देणारा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखाना देशातील अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जात आहे. या कारखान्याने स्व.भाऊसाहेब थोरात यांची कडवी शिस्त, काटकसर,पारदर्शकता व उत्कृष्ट व्यवस्थापन आणि नामदार बाळासाहेब थोरात यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे या साखर कारखान्याने देशात आदर्श निर्माण केला आहे.

या ऊस गळीत हंगाम शुभारंभाप्रसंगी ज्येष्ठ नेते बाजीराव पा.खेमनर,अ‍ॅड.माधवराव कानवडे, सौ.दुर्गाताई तांबे,सत्यजीत तांबे,रणजितसिंह देशमुख,इंद्रजितभाऊ थोरात,शिवाजीराव थोरात,सौ.सुनंदाताई जोर्वेकर,सौ.मिराताई शेटे,शंकर पा.खेमनर,लक्ष्मणराव कुटे,विश्वासराव मुर्तडक,अमित पंडित,रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे,राजेंद्र गुंजाळ, भाऊसाहेब एरंडे,राजेंद्र कडलग, अ‍ॅड. सुहास आहेर,सुधाकर रोहम, आरीफभाई देशमुख,आनंद वर्पे, सौ.निर्मलाताई गुंजाळ, सौ.अर्चनाताई बालोडे,प्रा।बाबा खरात,निखील पापडेजा,गौरव डोंगरे, सुरेश थोरात,सुरेश झावरे,माधवराव हासे, सुभाष सांगळे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.

तरी या कार्यक्रमासाठी सर्व सभासद, ऊस उत्पादक व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

फडणवीसजी, स्वप्नातून बाहेर या आणि वास्तव स्विकारा; अतुल लोंढेंचा टोला

Mysore sugar factory must remain with state: Siddaramaiah

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी