31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयईडीने सील केलेल्या डी.एस.कुलकर्णींच्या बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला

ईडीने सील केलेल्या डी.एस.कुलकर्णींच्या बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला

टीम लय भारी

पुणे : प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी गेल्या ४ वर्षांपासून तुरुंगात आहेत. ईडीने त्यांच्यावर केलेल्या कारवाईदरम्यान त्यांचा बंगलाही जप्त केला होता. याच बंगल्यावर चोरट्यांनी हात साफ केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Thieves raid DS Kulkarni’s bungalow sealed by ED)

बंगल्याच्या दरवाज्याचे सील आणि लॉक तोडून चोरट्यांनी बंगल्यातले ८ एलईडी टीव्ही, कॉम्प्युटर्स, सीडी प्लेअर, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघरातल्या चांदीच्या वस्तू, कॅमेरा, गिझर असा एकूण ६ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय कुमारने ‘रक्षाबंधन’चे शूटिंग केले पूर्ण, ‘या’ तारखेला रिलीज होणार चित्रपट!

समीर वानखेडेंच्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण

चतुःश्रुंगी मंदिराजवळ डीएसकेंचा ४० हजार चौरस फुट जागेत पसरलेला बंगला आहे. डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हा बंगला ईडीने जप्त केला होता. तसंच सील केला होता. या बंगल्याचं सील तोडून चोरट्यांनी मोठा ऐवज लंपास केला आहे. याबद्दल भाग्यश्री कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे.

बंगल्याच्या दरवाज्याचे सील आणि लॉक तोडून चोरट्यांनी बंगल्यातले ८ एलईडी टीव्ही, कॉम्प्युटर्स, सीडी प्लेअर, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघरातल्या चांदीच्या वस्तू, कॅमेरा, गिझर असा एकूण ६ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुस्लीम असल्यानेच आर्यन खानला दिला जातोय त्रास : मेहबुबा मुफ्ती

Dognappers on the prowl in Hyderabad, no leash on pet thiewes

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी