35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयसमीर वानखेडेंच्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण

समीर वानखेडेंच्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण

टीम लय भारी

मुंबई: एनसीबीनं (NCB) आर्यन खानसह एकूण ८ आरोपींना अटक केल्यापासून एनसीबीची ही कारवाई बनावट असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी  केली आहे. या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा खळबळजनक आरोप करत त्याविषयी तक्रार केली. यासंदर्भात आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खुलासा केला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात विचारणा केल्यानंतर त्यांनी यावर भूमिका मांडली आहे (Dilip Walse Patil explanation on Sameer Wankhede’s allegations).

समीर वानखेडे यांच्या आरोपांमुळे राज्यातलं वातावरण तापलेलं असतानाच मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. त्यामुळे या संदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी यासंदर्भात विचारणा करताच गृहमंत्र्यांनी तशा कोणत्याही सूचना कुणाला दिल्या नसल्याचं सांगत समीर वानखेडेंचे आरोप फेटाळून लावले.

प्रभाग रचना कशी करणार?, महापालिका प्रशासनाचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र

Indian Railway …आता रेल्वेस्थानकांवर स्पिटून वेंडिंग मशीन, थुंकण्यासाठी स्टिटून पाउचचा होणार वापर!

मला वाटत नाही की…

“मला वाटत नाही की मुंबई पोलिसांचे अधिकारी वॉच ठेवतात वगैरे. तशा कोणत्याही सूचना कुणालाही दिलेल्या नाहीत”, असं दिलीप वळसे पाटील यावेळी म्हणाले. तसेच, त्यांच्या आरोपांविषयी आपल्याला फार माहिती नाही, त्याची अतिरिक्त माहिती घेऊन मी त्यावर बोलेन, असं देखील वळसे पाटील यावेळी म्हणाले.

…तेव्हा नथुरामच्या चिल्ल्या पिल्यांना काय वाटतं याच्याशी आपलं काही संबंध नाही : जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला

‘No such information’: Maharashtra home minister on NCB official Sameer Wankhede’s stalking claim

समीर वानखेडेंच्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण

वानखेडेंची पोलीस महासंचालकांकडे तक्रार

वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची सोमवारी भेट घेतली व दोन पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार केली. वानखेडे यांच्यासह एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन हे देखील यावेळी उपस्थित होते. वानखेडे यांनी केलेल्या काही धक्कादायक दावे केले आहेत. काही लोक माझ्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत, असं वानखेडे यांनी जैन आणि पांडे यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोनजण वानखेडे यांच्यावर पाळत ठेवत त्यांच्या मागावर असल्याचे सीसीटीव्ही फुटेजही हाती लागल्याची माहिती देण्यात आली आहे. हे प्रकरण फार गंभीर आहे असं सांगत वानखेडे यांनी यावर थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी