33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रसीबीएसई बोर्डाचा १० वी १२ वी परीक्षेसंदर्भात 'हा' मोठा निर्णय!

सीबीएसई बोर्डाचा १० वी १२ वी परीक्षेसंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय!

टीम लय भारी

मुंबई :-  सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (सीबीएसई) ने १० वी १२ वीच्या विद्यार्थांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. १० वी १२ वीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना परीक्षा केंद्र बदलण्यास सीबीएसईने परवानगी दिली आहे. सीबीएसईने अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर या संदर्भात नोटीस जाहीर केली आहे. सीबीएसईच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यी एका केंद्रावरुन प्रात्याक्षिक परीक्षा आणि एका केंद्रावरुन लेखी परीक्षा देऊ शकतात.

विद्यार्थ्यांना काय करावे लागेल?

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याबद्दलचा अर्ज त्यांच्या शाळेमार्फत करावा लागेल. अर्जामध्ये ते ज्या परीक्षा केंद्रावरुन परीक्षा देऊ इच्छितात त्या केंद्राबद्दल माहिती लिहावी लागेल. परीक्षा केंद्र बदलण्याबाबतचा अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ मार्च पर्यंत आहे. विद्यार्थी सीबीएसईच्या वेबसाईट वरुन अर्ज करु शकतात.

सीबीएसई परीक्षेसंदर्भातील नियम

  • त्यासोबत, या परिक्षेसंबंधी नियमही जाहीर करण्यात आले आहेत. जर तुम्ही ही परीक्षा देणार असाल तर तुम्हाला हे नियम माहिती असणे गरजेचे आहे.
  • १० वी आणि १२ वीच्या मुख्य परीक्षांमध्ये निश्चित वेळेचे अंतर असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचा तणाव दूर होईल आणि त्यांना तयारीसाठी वेळ मिळेल.
  • १२ वीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये होईल, वेळ वाचवण्यासाठी असे केले जात आहे. दुसऱ्या शिफ्टमधील परीक्षा ही परदेशात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल.
  • दुसऱ्या शिफ्टमध्ये चार दिवस परीक्षा होईल. या दिवसांमध्ये १० ची मॉर्निंग शिफ्टमध्ये मुख्य विषयांची परीक्षा असेल. यापैकी जास्त करुन परीक्षा या परीक्षा सेंटरवर होईल. दुपारची परीक्षा निवडक सेंटरवर होईल.
  • जे शिक्षक सकाळच्या शिफ्टला काम करतात त्या शिक्षकांना दुपारच्या शिफ्टला काम करावे लागणार नाही.
  • सीबीएससी बोर्ड परीक्षेचे कंट्रोलर डॉ. संयम भारद्वाजकडून जारी केलेल्या या नियमांनुसार, यावर्षी कमीत कमी दिवसांमध्ये या परीक्षा आयोजित केल्या जातील. गेल्या वर्षी २०२० मध्ये परीक्षा शेड्युल ४५ दिवसांचा होत. यंदा हा ३९ दिवसांचा असेल.
  • १० वीच्या वर्गाची ७५ विषयांची परीक्षा आणि १२ वीच्या १११ विषयांची परीक्षा होईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी