27 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरएज्युकेशनदहावीत उत्तीर्ण होऊनही विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

दहावीत उत्तीर्ण होऊनही विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील दहावीचा निकाल यंदा दरवर्षीपेक्षा थोडा लवकर जाहीर करण्यात आलेला आहे. पण एक महिना होऊन सुद्धा दहावीचे विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश कधी करण्यात येणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विचारण्यात येत आहे.

दरम्यान, राज्य मंडळाचा दहावीचा निकाल एक महिना आधी जाहीर झाला असला तरी, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाचा निकाल अजूनही जाहीर झालेला नाही. त्यामुळेच अकरावीचे प्रवेश सुरु करण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु सात-आठ टक्के विद्यार्थ्यांसाठी लाखो विद्यार्थ्यांचे प्रवेश अजूनही का सुरु करण्यात आलेले नाही? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात दहावीच्या राज्य मंडळाच्या परीक्षा उशिरा घेण्यात आल्या. पण तरीही दरवर्षीपेक्षा यंदा दहावीचा निकाल लवकर लावण्यात आला. त्यामुळे यावर्षी मुलांचे अकरावीमध्ये प्रवेश लवकर करण्यात येतील, असेच विद्यार्थ्यांच्या पालकांना वाटले होते. पण सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे दहावीचे निकाल जाहीर न झाल्याने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश देखील लांबणीवर टाकण्यात आले आहेत.

दरवर्षी राज्य मंडळाचे दहावीचे निकाल हे उशीरा जाहीर करण्यात येतात. तर सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे निकाल लवकर जाहीर करण्यात येतात. पण यंदा या दोन्ही बोर्डांच्या निकालाला जुलै महिन्याचा अखेर उजाडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा :

अंबरनाथ नगर परिषदेतही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसणार धक्का

काय सांगता…? 74 वर्षीय तरुणाचा चक्क मोटारसायकलवरून सांगली ते अमरनाथ प्रवास

खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना दडपण्याचे षडयंत्र? मागास वर्गीय मुलांची मदतीसाठी हाक

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!