31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeमनोरंजनTMKOC : बबिता नंतर आता टप्पूनेही त्यांच्या रीलेशनशिपची अफवा पसरवणाऱ्यांना दिले खरमरीत...

TMKOC : बबिता नंतर आता टप्पूनेही त्यांच्या रीलेशनशिपची अफवा पसरवणाऱ्यांना दिले खरमरीत उत्तर

टीम लय भारी

मुंबई : सोनी सबवर प्रदर्शित होणारी लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मध्ये टप्पूची भूमिका साकारणारा राज अनादकत याने त्याच्या आणि बबितामध्ये प्रेमाचे संबंध असल्याची अफवा पसरवणाऱ्यांना खरमरीत उत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी राज आणि बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे वृत्त समोर आले होते (TMKOC character Tappu gave a harsh answer to the rumor mongers).

परंतु दोघांनीही सोशल मीडियाद्वारे हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले आहे. राज अनादकत याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने लिहिले आहे की, जे कोणीही माझ्याबद्दल काहीही लिहीत आहेत त्यांच्यासाठी, तुमच्या या बनावट कथांचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होईल याचा विचार करा. माझे मत न जाणून घेता माझ्याबद्दल तुम्ही काहीही लिहित आहात. तुमची ही सर्जनशीलता इतरत्र दाखवावी त्याचा तुम्हाला फायदा होईल. देव त्या लोकांना सदबुद्धी देवो, असे राजने लिहिले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मराठवाडा दौऱ्यावर भाजपचा सवाल

शरद पवारांनी काँग्रेसमध्ये यावे, बाळासाहेब थोरातांच्या वक्तव्याचा विजय वडेट्टीवार यांच्याकडून पुनरुच्चार

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Anadkat (@raj_anadkat)

मालिकेत बबिताची भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्तानेही या आधी आपल्याबद्दल चुकीची अफवा पसरवणार्यांना धारेवर धरले होते. तुम्ही कोणाबद्दल काहीही कसे लिहू शकता? असा सवाल तिने केला होता. १३ वर्षांपासून या मालिकेतून मी लोकांचे मनोरंजन करत आहे. परंतु तुम्ही १३ मिनिटांमध्येच माझी प्रतिमा पूर्णपणे खराब केली. तसेच आज मला भारताची मुलगी म्हणवून घ्यायलाही स्वतःची लाज वाटते, अशा शब्दात तिने अफवा पसरवणाऱ्यांचा समाचार घेतला होता.

धर्मनिरपेक्ष पक्षांचा जातीयवादी चेहरा उघड, जिल्ह्यावासीयांसमोर बुरखा फाटला

Munmun Dutta slams Raj Anadkat dating rumours, TMKOC star tells trolls ‘ashamed of calling myself a daughter of India’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी