31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजअमोल कोल्हेंनी घोड्यावर स्वार होऊन मारली बारी

अमोल कोल्हेंनी घोड्यावर स्वार होऊन मारली बारी

टीम लय भारी

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे त्यांच्या वक्तव्यांसाठी आणि अभिनयासाठी चर्चेत असतात. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द अखेर खासदार अमोल कोल्हे यांनी आज सत्यात उतरवला आहे. कोल्हे आज बैलगाडा शर्यतीत घोडीवर ‘स्वार’ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित असलेल्या जनसमुदायाने एकच जल्लोष केला. आज पुणे जिल्ह्यातील निमगाव दावडी येथील घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हे यांनी उपस्थिती दर्शवीत घोडीवर स्वार झाले(Amol Kolhe rode on a horse, he kept his word).

घोडी धरेल की नाही अशी शंका होती, त्यांना उत्तर मिळालं आहे, असं म्हणत अमोल कोल्हेंनी आढळरावांना टोला लगावला. हात सोडून अक्खा घाट चालवलाय, असं कोल्हे म्हणाले. घाटात दोन्ही हात वर करून कोल्हेंनी सर्वांना अभिवादन केलं. त्यामुळे उपस्थित सर्वांनीच कोल्हेंच्या घोडेस्वारीवर टाळ्या वाजवल्या.शब्द पूर्ण केला…सर्वांच्या साक्षीने पूर्ण केला..बारी मारली! असं ठसक्यात कोल्हेंनी सांगितलं. आणि शर्यतीसाठी उपस्थित सर्वांनीच जल्लोष केला.

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी याच मुद्द्यावरून अमोल कोल्हे यांना 11 फेब्रुवारीला छेडलं होतं. प्रचारात दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आढळरावांनी त्यांच्या गावातील घाटात येण्याचं आमंत्रण कोल्हे यांना दिले होते. आढळराव पाटील यांनी कोल्हेंना खुलं आव्हान दिलं होतं. बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन, असे आश्वासन कोल्हे यांनी दिले होते.

Amol Kolhe rode on a horse, he kept his word
हात सोडून अक्खा घाट चालवलाय, असं कोल्हे म्हणाले

हे सुद्धा वाचा

मला माझ्या नेत्याला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेलं बघायचंय; खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य

“मी फार छोटा माणूस…” असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर लगावला टोला

अमोल कोल्हे म्हणतात, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व केले, तर अभिमान असेल, पण….

Maharashtra: I apologize if my role as Nathuram Godse in film hurt public sentiments, says NCP MP Amol Kolhe

अमोल कोल्हेंच्या आश्वासनावरून आढळराव पाटलांनी त्यांना अनेकदा घाट दाखवला. पुढे देखील ते अनेकदा कोल्हेंना या मुद्यावरुन कोंडीत पकडू शकतात, हे लक्षात आल्यानं पहिल्या बारीत नाही तर नाही निदान मानाच्या घाटात तरी घोडीवर बसण्यासाठी कोल्हे आज तयार झालेत. कोल्हेंची बारी पाहायला बैलगाडा शौकिनांना देखील उत्सुकता लागलेली होती. अखेर ती शौकिनांची इच्छा कोल्हेंनी पूर्ण केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी