31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजरोहित पवारांचा अर्ज बाद झाल्याची चर्चा : कर्जत - जामखेडमध्ये उडाली खळबळ 

रोहित पवारांचा अर्ज बाद झाल्याची चर्चा : कर्जत – जामखेडमध्ये उडाली खळबळ 

लयभारी न्यूज नेटवर्क 
जामखेड : राज्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या रोहित राजेंद्र पवार या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद (अवैध) झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातून 27 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 16 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर 4 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. अर्ज बाद होणाऱ्या उमेदवारांमध्ये रोहित राजेंद्र पवार या उमेदवाराचा समावेश आहे.
कर्जत  – जामखेड विधानसभा मतदारसंघात शरद पवारांचे नातू रोहित राजेंद्र पवार राष्ट्रवादीकडून उमेदवारी करत आहेत. रोहित पवार यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या बीड जिल्ह्यातील पिंपळवाडी (ता पाटोदा) येथील रोहित राजेंद्र पवार या व्यक्तीने कर्जत – जामखेडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज छाननीत पिंपळवाडीच्या रोहित पवारांचा अर्ज बाद झाला. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचाच अर्ज बाद झाल्याची चर्चा दिवसभर सोशल मीडीयावर चर्चिली जात होती.
कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात एकूण 27 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 16 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर 4 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. रोहित राजेंद्र पवार (पिंपळवाडी तालुका पाटोदा जि बीड ), शेख युनुस दगडू, रावसाहेब मारुती खोत, आशाबाई रामदास शिंदे हे चार उमेदवार अपात्र ठरलेले आहेत. शेख युनूस दगडू व रोहित राजेंद्र पवार यांनी अपूर्ण शपथपत्र दिल्याने त्यांचे अर्ज बाद झाले आहेत. रावसाहेब मारुती खोत हे अनामत रक्कम अपुरी असलेने अपात्र ठरले. तर आशाबाई रामदास शिंदे यांचा भारतीय जनता पार्टीचा पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज होता. मुख्य उमेदवार राम शिंदे यांचा अर्ज मंजूर झाल्याने व अपक्ष उमेदवारीसाठी आवश्यक पात्रता पूर्ण केली नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला आहे.
दरम्यान, कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार व राम शिंदे यांच्या नावाने डमी उमेदवारही रिंगणात उतरले होते. त्यातील रोहित पवार यांचा अर्ज बाद झाला आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील वैध उमेदवार
रामदास शंकर शिंदे – भारतीय जनता पार्टी
रोहित राजेंद्र पवार – राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष
शंकर मधुकर भैलुमे – बहुजन समाज पार्टी
अरुण हौसराव जाधव – वंचित बहुजन आघाडी,
अप्पासाहेब नवनाथ पालवे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना,
सोमनाथ भागचंद शिंदे – जनहित लोकशाही पार्टी
अशोक सर्जेराव पावणे – अपक्ष
उत्तम फकिरा भोसले – अपक्ष
किसन नामदेव सदाफुले – अपक्ष
गोविंद लक्ष्मण आंबेडकर – अपक्ष
बजरंग मनोहर सरडे – अपक्ष
महारुद्र नरहरी नागरगोजे – अपक्ष
राम रंगनाथ शिंदे – अपक्ष
सुमीत कन्हेय्या पाटील – अपक्ष
शहाजी राजेंद्र काकडे – अपक्ष
ज्ञानदेव नरहरी सुपेकर – अपक्ष

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी