32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजमनसे उमेदवाराचा अर्ज बाद

मनसे उमेदवाराचा अर्ज बाद

लय भारी न्यूज नेटवर्क

हिंगणघाट : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत काल संपली. त्यानंतर शनिवारपासून निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेमध्ये वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. अतुल वांदिले असे या मनसे उमेदवाराचे नाव आहे.

निवडणूक अर्जासोबत नोटरी केलेले शपथपत्र सादर करणे बंधनकारक आहे. पण वांदिले यांचे शपथपत्र नोटरी केलेले नव्हते. ही बाब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वांदिले यांच्या निदर्शनास आणून दिली होती, व छानणीपूर्वी नोटरी केलेले शपथपत्र सादर करण्याची सूचना त्यांना केली होती. त्यानंतरही वांदिले यांनी दिलेल्या मुदतीमध्येही शपथपत्र सादर केले नाही. परिणामी त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला.

मनसेने राज्यात एकूण 100 ठिकाणांहून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात हिंगणघाट मतदारसंघाचाही समावेश होता. पण वांदिले यांचा अर्ज बाद झाल्याने मनसेची एका मतदारसंघातील लढत कमी झाली आहे.

हिंगणघाट विधानसभा निवडणुकीत आता एकूण 17 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यात राजू तिमांडे (राष्ट्रवादी काँग्रेस), एड. सुधीर कोठारी (अपक्ष), विलास नानाजी टेंभरे (बसपा), प्रशांत देशमुख (संभाजी ब्रिगेड), डॉ. उमेश वावरे (वंचित बहुजन आघाडी), दमडू वारलू मडावी (गोंडवाना गणतंत्र पार्टी), मनीष पांडूरंग नांदे (लोकजागर पार्टी), मंदा ठवरे (अपक्ष) इत्यादी उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी