32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूज"अगर देश बचाना है, तो मोदी को हटाना है," संतप्त आंदोलकांची घोषणाबाजी

“अगर देश बचाना है, तो मोदी को हटाना है,” संतप्त आंदोलकांची घोषणाबाजी

पुणे : कृषी कायद्यांविरोधात आज भारत बंद आहे. शेतकरी संघटनांकडून आंदोलन सुरु आहे. पुण्यात अलका चौक ते मंडई दरम्यान मोर्चा काढला जाणार होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अलका चौकात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनकांनी “अगर देश बचाना है, तो मोदी को हटाना है” अशा घोषणा देण्यात आल्या.

दिल्ली येथील आंदोलनास समर्थन दर्शविण्यासाठी पुण्यातील अलका चौकात महाविकास आघाडीसह अन्य पक्ष, संघटना यांच्याकडून ठिय्या आंदोलन सुरु आहे

कृषी कायद्यांविरोधात गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

भारत बंदला विरोधकांनी पाठिंबा दर्शवलेला असून केंद्र सरकारने यावरुन टीका केली आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार आहे.

दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनांचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सिंघू सीमेवर पत्रकार परिषदेत केलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी