30 C
Mumbai
Monday, November 13, 2023
घरमहाराष्ट्रललित पाटीलची प्रकृती पुन्हा बिघडली...

ललित पाटीलची प्रकृती पुन्हा बिघडली…

ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेल्या ललित पाटील (Lalit Patil) यांची पुन्हा प्रकृती बिघडली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बंगळुरू मधून अटक केलेल्या ललित पाटीलला आता पुणे पोलिसांकडे (Pune Police) सुपुर्द करण्यात आले आहे. आता पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ललित पाटीलची प्रकृती (Lalit Patil Health Update)  बिघडली असून त्याला पुन्हा जुन्या आजारांचा त्रास होऊ लागला आहे. ललित पाटील मागील तीन वर्षांपासून येरवडा कारागृहात होता. या तीन वर्षांच्या काळात विविध उपचाराच्या नावाखाली तो नऊ महिने ससून रुग्णालयात होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तो ससून रुग्णालयातून फरार झाला होता. मुंबई पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता कर्नाटकातील बंगळुरू मधून अटक केली होती. आता, पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेतल्यानंतर, त्याला पुन्हा जुन्या आजारांचा त्रास होत असून त्याच्यावर कोठडीतच उपाचार केले जात आहे.

ललित पाटीलला कसला त्रास होतोय?

ललित पाटील याची तब्येत पुन्हा बिघडली असून गेल्या चार दिवसांपासून त्याला पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे. तसेच त्याला हर्नियाचादेखील त्रास होत आहे. परंतु ससून हॉस्पिटलमधील (Sassoon Hospital) प्रकारामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट न करता पोलीस कोठीतच उपचार दिले जात आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ललित पाटील याच्यावर यापूर्वी स्वत: ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर (Dr Sanjiv Thakur) उपचार करत होते. त्याला टीबी आजारासह पाठदुखी आणि हार्नियाचादेखील आजार असल्याचे डॉ संजीव ठाकूर यांनी म्हटले होते.

हे ही वाचा 

सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील आहात; सावधान…आधी ही बातमी वाचा !

राज ठाकरेंवरील तडीपारीचा गुन्हा रद्द

बनावट रॉयल्टी बूक छापून डंपर लॉबीचा सरकारला ‘इतक्या’ कोटींचा चुना

दरम्यान, डॉ संजीव ठाकूर यांना ललित पाटील प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. यावर, कॉँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरयांनी महंतले की, “कालचा अहवाल आणि ठाकूर यांच्यावरील कारवाई म्हणजे नाटक आहे. संजीव ठाकूर यांना वाचवण्याचे काम सरकार करत आहे. संजीव ठाकूरवर मोक्का अंतर्गत कारवाई करायला हवी.” तसेच, डॉ संजीव ठाकूर यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.

“सरकार या प्रकरणात लोकांना वेड्यात काढत असून लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. या प्रकरणात ज्यांनी, ज्यांनी पैसे घेतले आहेत, त्यांची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. तसेच दोषी आढळतील त्या सगळ्यांना सहआरोपी करा,” असे आमदार धंगेकर यांनी म्हटले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी