30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजमतदान ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याबाबतचे विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार

मतदान ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याबाबतचे विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार

टीम लय भारी

नवी दिल्ली : निवडणुकीत बोगस मतदान रोखण्यासह इतर सुधारणेच्या दृष्टीकोनातून मोदी सरकार एक महत्त्वपूर्ण विधेयक आज लोकसभेत मांडणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशात आजच्या कार्यसूचीमध्ये मतदान ओळखपत्राला आधार कार्डशी जोडण्याबाबतचे विधेयक ‘निवडणूक कायदा दुरुस्ती विधेयक २०२१’ (Election Laws Amendment Bill 2021) याचा समावेश आहे(Bill will be tabled to link voter ID with Aadhar card).

बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये या विधेयकच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. या विधेयकामध्ये मतदार यादीत एका व्यक्तीचे नाव दोनदा आणि बनावट मतदान रोखण्यासाठी मतदान ओळखपत्राला आधार कार्ड जोडण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

बाळाचा जन्म होताच मिळणार आधार कार्ड, UIDAI च्या नव्या उपक्रमाबद्दल जाणून घ्या

जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचं मुंबईत रजिस्टर तर गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने मुलीचं लग्न; स्पष्टीकरण देताना म्हणाले…

आज लोकसभेत केंद्रीय विधि आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) ‘निवडणूक कायदा दुरुस्ती विधेयक २०२१’ हे विधेयक मांडतील. माहितीनुसार या विधेयकात मतदान यादीत आधीच नाव नोंद असलेल्या व्यक्तीकडून त्याची ओळख सिद्ध करण्यासाठी अधिकारी आधार कार्ड क्रमांकाची मागणी करू शकतात. यामुळे एक व्यक्ती एकाहून जास्त मतदारसंघातील व्यक्तीची नोंदणी आणि एकाच मतदारसंघातील मतदार म्हणून वेगवेगळ्या पत्त्यावरील नोंदणी नाकारली जाऊ शकते. त्यामुळे निष्पक्ष आणि एक मतदार, एक मत या दिशेने वाटचाल करण्यासाठी मदत होईल.

काँग्रेसचं सत्तेतील स्थान तिसरं, निधी मिळवण्यात पटकावला दुसरा क्रमांक

Now Voter ID to be linked with Aadhar Card, Know what else is announced

 या विधेयकात असे देखील आहे की, जर एखाद्या व्यक्ती जवळ आधार कार्ड नाही तर त्याला मतदान यादीत नाव जोडण्यापासून रोखता येणार नाही. तसेच त्या व्यक्तीचे नाव आधीपासून नोंदणीकृत असल्याचे नाकारले जाऊ शकत नाही. अशी व्यक्ती इतर कागदपत्रांच्या आधारे स्वतःची नोंदणी करू शकतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी