31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूज1 जानेवारीपासून बदलणार चेक पेमेंटची पद्धत, हा नवा नियम लागू होणार

1 जानेवारीपासून बदलणार चेक पेमेंटची पद्धत, हा नवा नियम लागू होणार

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बँकिंग क्षेत्रातील घोटाळे मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. अशात ग्राहकांची होणार फसवणूक थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI 1 जानेवारी 2021 पासून धनादेशासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करण्याची शक्यता आहे. यामुळे नवीन वर्षात चेक Cheque पेमेंटशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार असल्याची माहिती आहे. खोट्या चेकद्वारे होणारा बँकिंग घोटाळा रोखण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे.

या सुविधेमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 50,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे देण्यासाठी रक्कम चेकद्वारे सुनिश्चित करणं महत्त्वाचं असणार आहे. या सिस्टमच्या माध्यमातून चेकला एसएमएस (SMS), मोबाइल अॅप (Mobile App), इंटरनेट बँकिंग (Internet Banking) आणि एटीएम (ATM) द्वारे दिला जाऊ शकतं.

कशी काम करणार पॉझिटिव्ह पे सिस्टम ?

पॉझिटिव्ह पे सिस्टमअंतर्गत जो धनादेश देईल त्याला चेकची तारीख, लाभार्थ्याचे नाव, प्राप्तकर्त्याचे नाव आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देयकाची रक्कम सांगावी लागणार आहे. व्यक्ती एसएमएस, मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएम सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे ही माहिती देऊ शकतो.

यानंतर चेक पेमेंट करण्यापूर्वी या माहितीची उलट तपासणीदेखील केली जाईल. ज्यामध्ये काही त्रुटी असल्यास चेक सिस्टम तपासाण्यात येईल. जर यामध्ये काही गडबड झाली तर ‘चेक ट्रंकेशन सिस्टम’  त्याला अधोरेखित केलं जातं आणि तशी बँकेला महत्त्वाची माहिती पुरवली जाते.

50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरल्यास नियम लागू

50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम असल्यास बँक खातेदारांसाठी नवीन नियम लागू करतील. इतकंच नाही तर या सुविधेचा लाभ घेण्याचा निर्णय हा खातेधारकांचा असेल. पण वारंवार समोर येणारे घोटाळे पाहता बँका 5 लाख आणि त्यापेक्षा अधिक धनादेशांच्या बाबतीत हे अनिवार्य करू शकतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी