31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजCoronavirus : दोन निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांकडून गोरगोरीबांना धान्य वाटप

Coronavirus : दोन निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांकडून गोरगोरीबांना धान्य वाटप

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ आपत्ती ( Coronavirus ) काळात गोरगरीबांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत. दोन निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. प्रभाकर देशमुख आणि तानाजी सत्रे या दोन्ही निवृत्त अधिकाऱ्यांनी ५,५०० हजार कुटुंबांना मदत केली आहे.

Coronavirus
प्रभाकर देशमुख यांनी केलेल्या मदत साहित्याचे पांढरवाडी या गावात वाटप होत असताना

ड्रीम सोशल फाऊंडेशन, समता फाऊंडेशन, मुकुल माधव फाऊंडेशन इत्यादी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून देशमुख व सत्रे यांनी ही मदत केली आहे. साखर, तूर डाळ, गोडे तेल, आंघोळीचा व कपड्यांचा साबण, मीठाचा पुडा अशी कीट तयार करण्यात आली आहेत.

माण व खटाव ( जि. सातारा ) तालुक्यातील १९० गावांतील ५,५०० कुटुंबांना ही मदत पोचविण्यात आली आहे. अत्यंत गरीब, निराधार, दिव्यांग, विधवा अशा कुटुंबांना ही मदत देण्यात आली आहे. प्रभाकर देशमुख यांनी पाच किलोची ४,५०० कीट दिली आहेत, तर तानाजी सत्रे यांनी १२ किलोची १००० कीट दिली आहेत.

सरकारी कार्यालयांसाठी सॅनिटायझरचे वाटप

प्रभाकर देशमुख यांनी माण व खटाव तालुक्यातील सरकारी यंत्रेणालाही मदत केली आहे. प्रांत, तहसिल, पोलीस, प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचायत समिती अशा कार्यालयांमध्ये ( Coronavirus ) प्रत्येकी ५ लिटरचे सॅनिटायझरचे त्यांनी वाटप केले आहे. दोन्ही तालुक्यांतील सर्व ग्रामपंचायतींनाही प्रत्येकी १ लिटर सॅनिटायझर देण्यात आले आहे.

Coronavirus
प्रभाकर देशमुख यांनी केलेल्या मदतीचे गोरगरीबांना वाटप करताना

‘कोरोना’च्या आपत्ती ( Coronavirus ) काळात माण – खटावमधील सरकारी अधिकारी व कर्मचारी उत्कृष्ट काम करीत असल्याचा शुभेच्छा संदेशही देशमुख यांनी दिला आहे.

ऊस तोड कामगारांना पोचविली तातडीची मदत

माण तालुक्यातील जांभुळणी गावात ऊस तोड कामगारांची काही कुटुंबे आहेत. यामधील काही कुटुंबांची अत्यंत दयनीय स्थिती आहे. या कुटुंबांबद्दल प्रभाकर देशमुख यांना माहिती मिळाली. त्यांनी लगेचच प्रत्येक कुटुंबांना दोन किट्स पाठवून दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

मदत करताना राजकीय भेदाभेद नाही

प्रभाकर देशमुख यांनी निवृत्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी विधानसभा निवडणूक सुद्धा लढविली होती. अवघ्या १८०० मतांनी त्यांचा पराभव झाला. ते राजकारणात सक्रीय आहेत. परंतु या काळात ( Coronavirus ) मदत देताना राजकीय भेदाभेद करू नका अशा सुचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत.

ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे, अशा लोकांना प्राधान्याने मदत करा. हे लोक कोणत्याही पक्षाचे असले तरी मदत करताना राजकारण बघू नका. गरजू लोकांनाच मदत द्या अशा सुचना देशमुख यांनी कार्यकर्त्यांना केल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

लॉकडाऊनमध्ये फिरणा-या तोतया आमदाराला ठोकल्या बेड्या 

Coronavirus : मंत्रालय दोन दिवस बंद, ‘कोरोना’चे रूग्ण सापडल्याने खबरदारी

आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या एका फोनवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाचविले तरूणाचे प्राण

भारतात ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या ३५ हजार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी