27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयप्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी पॅनेलचा विजय

प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी पॅनेलचा विजय

टीम लय भारी 

मुंबई:  प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने (Maha vikas aghadi) विजयश्री खेचून आणली.येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीत तब्बल पंधरा वर्षानंतर ऐतिहासिक सत्तांतर झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने विजयश्री खेचून आणली आहे. Maha vikas aghadi panel led by Prabhakar Deshmukh

पश्चिम माणच्या मध्यवर्ती अशा मलवडी गावच्या विकास सोसायटी निवडणूककडे अनेकांचे लक्ष लागले होते. कधी नव्हे ती यावेळी सोसायटी निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. कोणत्याही परिस्थितीत सत्ता कायम ठेवणार असा विश्वास बाळगून सत्ताधारी दादासाहेब जगदाळे हे श्रीराम शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवत होते. Maha vikas aghadi panel led by Prabhakar Deshmukh

तर यावेळी परिवर्तन करायचेच असा निर्धार करुन प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांच्या नेतृत्वाखाली समविचारी मंडळी श्री मल्हारी म्हाळसाकांत परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून एकत्र आली होती. तर अनिल हराळे व शिवाजी सावंत हे अपक्ष निवडणूक लढवत होते. Maha vikas aghadi panel led by Prabhakar Deshmukh

मलवडी, सत्रेवाडी, नवलेवाडी कार्यक्षेत्र असलेल्या या सोसायटीसाठी दोन्ही पॅनेलने प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचून प्रचार केला. काल मतदानाच्या दिवशी चुरशीने मतदान होवून ४४७ मतदानांपैकी ३९९ मतदान झाले. मतमोजणीत मोठ्या प्रमाणात क्राॅस मतदान झाल्याचे दिसून आले. मात्र विकासासाठी एकत्र आलेल्या समविचारी कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध प्रचार करत मोठा उलटफेर करत सत्तांतर घडविले.

श्री मल्हारी म्हाळसाकांत परिवर्तन पॅनेलचे पोपट कदम, संतोष मगर, सचिन मगर, ताराचंद जगदाळे, कुंडलिक नवले, कल्पना दळवी, सचिन देवकर, संजय जाधव व मिलिंद खरात हे नऊ उमेदवार विजयी झाले. तर श्रीराम शेतकरी विकास पॅनेलचे दादासाहेब जगदाळे, मानसिंग जगदाळे,अनिल सुतार व पद्मा मगर हे उमेदवार विजयी झाले.

विजयी उमेदवारांचे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख,(Prabhakar Deshmukh) जिल्हा परिषद सदस्य बाबासो पवार यांनी अभिनंदन केले.श्री मल्हारी म्हाळसाकांत पॅनेलचे विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जंगी मिरवणूक काढली.

हे सुध्दा वाचा: 

आमदार जयकुमार गोरे म्हणजे अहंकार, प्रभाकर देशमुखांचे टीकास्त्र

प्रभाकर देशमुखांचा जयकुमार गोरेंवर तीक्ष्ण वार !

मुंबईच्या भविष्यासाठी पुन्हा एकदा मुंबईकर शिवसेनेच्याच पाठीशी उभे राहणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी