34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजसत्तेवरच्या गाढवांना गाईच्या दुधाची किंमत कळत नाही : राजू शेट्टी

सत्तेवरच्या गाढवांना गाईच्या दुधाची किंमत कळत नाही : राजू शेट्टी

टीम लय भारी

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बारामतीत येऊन दूध दरवाढीसाठी राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारला. यावेळी त्यांनी मोर्चात सहभागी झालेल्या शेतक-यांना संबोधित करताना राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. गाढविनीचे दूध 1 हजार रुपये लिटर किंमतीने मिळते. पण सत्तेवरच्या गाढवांना गाईच्या दुधाची किंमत कळत नाही?’, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला.

शेट्टींच्या नेतृत्वात बारामती नगरपरिषद ते प्रांत कार्यालय  निघाला

राजू शेट्टी बारामतीत दाखल होताच कार्यकर्त्यांनी हलगी वाजवत त्यांचे स्वागत केले. मोर्चात सहभागी झालेले शेतकरी आपल्यासोबत जनावरांनाही घेऊन आले होते. बारामती नगरपरिषद ते प्रांत कार्यालय असा मोर्चा निघाला. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

‘आम्हाला जास्त जनावरे आणायची होती, पण पोलिसांनी अडवले. आम्हाला अडवायचा पोलिसांना अधिकार आहे. मात्र आमच्यावर ही वेळ का आली? याचा विचार करा. गोमूत्राची किंमत 110 रुपये लिटर, शेण विकले जाते. गाढविनीचे दूध 1 हजार रुपये लिटर किंमतीने मिळते पण आमच्या दुधाला किंमत नाही.

‘दूध रस्त्यावर ओतले म्हणून आमच्याकडे देशद्रोही म्हणून बघता. शेतक-याने रागाच्या भरात दूध रस्त्यावर ओतले तर तुम्हाला राग येतो. पण त्याची आणि पाण्याची किंमत काय? याचा विचार करा’, असे राजू शेट्टी म्हणाले.

‘तीन वर्षांच्या तुलनेत यंदा दूध उत्पादन कमी झाले. जनावरांच्या संख्येत फरक पडला. लॉकडाऊनमुळे दूध उत्पादनाला फटका बसला. लॉकडाऊन कुणी जाहीर केले, त्यांनी विचार केला पाहिजे’, असे मत राजू शेट्टी यांनी मांडले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी