31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजनवीन वर्षाच्या सुरुवातीला ग्राहकांना मिळाली मोठी सूट

नवीन वर्षाच्या सुरुवातीला ग्राहकांना मिळाली मोठी सूट

टीम लय भारी

नवीन वर्षात इंडियन ऑइलने आपल्या ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. इंडियन ऑइलने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे(Customers get big discounts at the beginning of new year).

घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याआधी डिसेंबर महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या.घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती गेल्या ऑक्टोबरमध्ये वाढवण्यात आल्या होत्या. डिसेंबरमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात 100 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही ही जनतेसाठी दिलासादायक बाब होती.

मुंबईत कलम १४४, १५ जानेवारीपर्यंत वाढवले

नव्या वर्षात जीएसटीमध्ये वाढ; ‘या’ वस्तू महागणार, ग्राहकांना बसणार आर्थिक झळ

व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात झाल्याने रेस्टॉरंट मालकांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती किंचित वाढल्या आहेत. परंतु, पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुका लक्षात घेता मोदी सरकार पेट्रोल-डिझेलप्रमाणे गॅसही स्वस्त करेल, असा अंदाजही वर्तवला जात आहे.

नवीन वर्षात गॅस कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. ही कपात 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरवर करण्यात आली आहे. आयओसीएलच्या मते, 1 जानेवारी 2022 पासून मुंबईतील व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 100 रुपयांपेक्षा जास्तने कमी होऊन 1948 पर्यंत खाली आली आहे. मुंबईमध्ये विनाअनुदानित 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपये आहे.

रविवारी 24 तासांचा मेगा ब्लॉक, ठाणे-दिवा मार्गावरील वाहतुकीवर होणार परिणाम,लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द

LPG price today, Jan 1: Indian Oil reduces commercial cylinders rate; check latest price in your city

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी