35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजवाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यत रद्द

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यत रद्द

टीम लय भारी

पुणे : कोविड-१९ च्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील मौजे चिंचोडी आणि मावळ तालुक्यातील मौजे नानोली तर्फे चाकणमधील बैलगाडा शर्यतीला पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत(Bullock cart race cancelled on the back of rising corona).

नवीन वर्षाच्या तोंडावर पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालकांच्या आणि शर्यतप्रेमींच्या आनंदावर विरजण पडलं आहे. या शर्यतीसाठी शिरूरचे माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील हे आपल्या लांडेवाडी या गावी तर मावळचे राष्ट्रवादी आमदार सुनील शेळके हे मावळ तालुक्यात नाणोली येथे राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या उपस्थित ही शर्यत घेणार होते.बैलगाडा शर्यत सुरू केल्याने आनंदाला उधाण आल्याचे स्पष्ट दिसले.

मुंबईत कलम १४४, १५ जानेवारीपर्यंत वाढवले

महाराष्ट्रात पहिला ‘ओमिक्रॉन मृत्यू’ नोंदवला गेला

राष्ट्रवादी आमदार सुनील शेळके यांनी आयोजित केलेल्या ओझरमिग येथे होणाऱ्या शर्यतीकडे राज्याचे लक्ष लागून होते. राज्यभरातून स्पर्धक यात सहभाग नोंदवला. दरम्यान पोलिसांनी आयोजकांवर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती समोर आली. मौजे चिंचोडी इथे शितलादेवी यात्रेनिमित्त आणि मौजे नानोली इथे दत्त जयंती उत्सवानिमित्त आज दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी बैलगाडा शर्यत पार पडणार

मोदींना महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादीचे सरकार हवे होते, पण मी नाही म्हणालो : शरद पवार

Pune: Bullock cart races cancelled in wake of surge in Covid-19 cases

31 डिसेंबर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत या बैलगाडा शर्यतीच्या परवानगीचा पुनर्विचार करण्यात आला. यात शासनाच्या नवीन नियमानुसार समाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये 50 जणांच्या उपस्थितीच्या मर्यादेनुसार आयोजकांना खुलासा विचारण्यात आला.

गेली काही वर्षे बैलगाडा शर्यतीवरील बंदीमुळे गाडामालकांचा हा आनंद जणू हरवला होता; परंतु बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्याने बैलगाडा मालकांमध्ये उत्साह संचारला आहे. ‘हा क्षणही आमच्यासाठी दिवाळी-दसरा सणापेक्षा मोठा नाही’, अशी भावना ठाणे जिल्ह्यातील गाडामालक व्यक्त करीत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी