31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजआता जगावर ‘डेल्मिक्रॉन’चं सावट वैज्ञानिकांनी दिला धक्कादायक इशारा!

आता जगावर ‘डेल्मिक्रॉन’चं सावट वैज्ञानिकांनी दिला धक्कादायक इशारा!

टीम लय भारी

नवी दिल्ली: जगभरामध्ये करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. जगातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढताना चित्र दिसत आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये करोनाच्या या नवीन विषाणूमुळे परिस्थिती दिवसोंदिवस चिंताजनक होत चाललीय. मात्र ओमायक्रॉनची दहशत असतानाच या देशांमध्ये आता ‘डेल्मिक्रॉन’च्या बातम्याही समोर येऊ लागल्या. (Delmicron Scientists have given a shocking warning)

पाश्चिमात्य देश करोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या दुहेरी संकटामध्ये अडकण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. भारतामध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे ३५० रुग्ण आढळून आले आहेत. भारतामध्येही डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण वाढतील असं यापूर्वीच तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय.

Omicron: चिंतेतभर; देशात पुन्हा एकदा लॉकडाउन?

मुंबई महापालिका Omicron ला रोखण्यासाठी सज्ज; महापौरांनी मुंबईकरांना केलं आवाहन,म्हणाल्या…

मात्र लसीकरण आणि डेल्टाचा प्रादुर्भाव पाहता भारताआधी युरोपीयन देश आणि पाश्चिमात्य देशांमध्ये डेल्मिक्रॉनचा अधिक परिणाम दिसून येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आलीय

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्राच्या कोव्हिड-१९ टास्क फोर्सचे सदस्य असणाऱ्या शशांक जोशी यांनी, “डेल्मिक्रॉन या डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या एकत्र संसर्गामुळे युरोप आणि अमेरिकेतील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलीय,” असं सांगितलं. ओमायक्रॉन पहिल्यांदा नोव्हेंबर महिन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळून आलेला. आतापर्यंत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव तब्बल ८९ देशांमध्ये झालाय.

Omicron: चिंतेतभर; देशात पुन्हा एकदा लॉकडाउन?

Telangana village imposes 10-day self-lockdown after man found Omicron positive

 डेल्मिक्रॉन हा करोना विषाणूचा नवा व्हेरिएंट नाहीय. पण यामध्ये डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या स्ट्रेनचा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि करोना रुग्णांची संख्या फार झपाट्याने वाढते. एका अहवालानुसार, ओमायक्रॉनचा अमेरिकेमध्ये प्रादुर्भाव वाढत आहे. तर सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेंशनने दिलेल्या माहितीनुसार डेल्टा व्हेरिएंटच्या प्रादुर्भावापैकी ९९.५ टक्के प्रकरण ही अमेरिकेशी संबंधित आहेत. प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉनमुळे अमेरिकेमध्ये आतापर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झालाय.मिरवणूक काढू नये, गर्दीचे कार्यक्रम आयोजित करू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी