31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजजनरल रावत यांची जागा कोण घेणार? नवे सीडीएस म्हणून मराठमोळ्या अधिकाऱ्याचं नाव...

जनरल रावत यांची जागा कोण घेणार? नवे सीडीएस म्हणून मराठमोळ्या अधिकाऱ्याचं नाव आघाडीवर

टीम लय भारी

नवी दिल्ली: देशाचे पहिले सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (Chief Of Defense Staff) जनरल बिपीन रावत यांचं अपघाती निधन झालंय. संपूर्ण भारतीय लष्कराची कमान ते सांभाळत होते. पण त्यांच्या निधनानं आता सीडीएसचं (CDS) पद रिकामं झालंय. उद्या जनरल रावत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील(General Bipin Rawat has died in an accident)

पण सीडीएससारखं सर्वोच्च लष्करी पद हे फार काळ रिकामं नाही ठेवता येणार. त्यातही चीन आणि पाकिस्तानच्या ज्या कुरापती सुरु आहेत, त्या पार्श्वभूमीवर तर नाहीच नाही. त्यामुळेच जनरल रावत यांच्या निधनानंतर आता नवे सीडीएस कोण होणार (Who will be new CDS?) याची चर्चा सुरु झालीय. आणि त्यासाठी एकमेव आणि आघाडीवरचं नाव आहे सध्याचे लष्कर प्रमुख मनोज मुकूंद नरवणे (Gen Naravane).

संजय राऊतांचे UPA मध्ये सहभागी होण्याचे संकेत

मंत्री यशोमती ठाकूर यांना ‘बघून घेण्याची’ धमकी देणा-या युवकाला ठोकल्या बेड्या

काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सीसीएसची मिटींग झाली. ही कमिटीत देशाच्या लष्करासंबंधीच्या सर्व निर्णयाची चर्चा होते. निर्णय घेतले जातात. जनरल रावत यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर सीसीएसची (CCS) बैठक झाली. ह्या बैठकीत रावत यांच्यासह मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि बैठक संपली. पुन्हा ज्यावेळेस सीसीएसची बैठक होईल त्यावेळेस मात्र नव्या सीडीएसवर चर्चा होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

जनरल नवरणेच का?

सध्यस्थितीत जनरल एमएम नरवणे हेच देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी आहेत. त्यातही जनरल रावत यांनी गेल्या काही काळात सीडीएस म्हणून जे काही प्रोजेक्ट सुरु केलेत, काम हाती घेतलेत, त्याची माहिती आणि अनुभव हा सर्वाधिक जनरल नरवणेंनाच आहे. कारण नरवणे हे सध्याचे लष्करप्रमुख आहेत.

“हेलिकॉप्टर अपघातानंतरही सीडीएस रावत जिवंत होते; अग्निशमन कर्मचाऱ्याचा दावा

Opposition MPs Call Off Protest Today To Pay Homage To Gen Bipin Rawat

सध्याचे वायूदल प्रमुख व्ही.आर.चौधरी हे सुद्धा मराठीच आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण नांदेडमध्ये झालेलं आहे. त्यांनी अलिकडेच इंडियन एअरफोर्सची जबाबदारी हाती घेतलीय. तर नेव्ही प्रमुख असलेल्या आर हरीकुमार यांनीही 30 नोव्हेंबरला सूत्रे हाती घेतलीयत. त्यामुळेच सीडीएसच्या पदासाठी जनरल नरवणेंची जी पात्रता, अनुभव आहे ती इतरांकडे नाही. त्यामुळेच जनरल नरवणेंचं नाव आघाडीवर आहे.

सीडीएससाठी पात्रता आणि जबाबदारी

जनरल नरवणे हे पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये निवृत्त होणार. लष्करप्रमुख म्हणून त्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपतोय. लष्करी नियमानुसार सीडीएसला 65 वर्ष वयापर्यंत त्या पदावर रहाता येतं. तर इतर तीनही सैन्यदल प्रमुखांना वयाच्या 62 वर्षापर्यंत त्या पदावर रहाता येतं. किंवा तीनच वर्षे त्या पदावर रहाण्याची अट आहे.

त्यानंतर मात्र ते निवृत्त होतात. जनरल नरवणे निवृत्त झाल्यानंतर सीडीएस पदावर रहाण्यासाठी सर्व पात्रता पूर्ण करतात. त्यामुळेच सीडीएसचे फ्रंट रनर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. लष्कराचे जे तीन दल आहेत-त्यांच्यात समन्वय ठेवण्याचं काम सीडीएस करतात. ट्रेनिंग-लॉजिस्टीक्स, कोणत्या दलाला, काय हवं काय नको, ते तातडीनं कसं होईल याची जबाबदारी सीडीएस पार पाडतात. तिनही दलात समन्वय ठेवून लष्कराची एनर्जी ठेवण्याचं प्रमुख कामही सीडीएसचच आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी