30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजजॅकलिन आणि नोरा फतेहीला आणखी एक धक्का, ईडीकडून मोठी कारवाई

जॅकलिन आणि नोरा फतेहीला आणखी एक धक्का, ईडीकडून मोठी कारवाई

टीम लय भारी

नवी दिल्ली: २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर सध्या अटकेत असून ईडीकडून याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची चौकशी केली जात आहे. सुकेश चंद्रशेखरने दोन्ही अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्याचं तपासात समोर आलं आहे. जॅकलिन तर पूर्णपणे सुकेशच्या जाळ्यात अडकली होती. दरम्यान आधीच या गैरव्यहारात आपलं नाव आल्याने धक्का बसलेल्या दोन्ही अभिनेत्रींवर ईडीकडून अजून एक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.( Jacqueline and Nora Fatehi, Big action from ED)

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन आणि नोरा फतेहीला दिलेल्या भेटवस्तू ज्यामध्ये लक्झरी कार, डायमंड्स, बॅग आहेत त्या सर्व ईडीकडून जप्त केल्या जाणार आहेत. सुकेश चंद्रशेखरच्या उत्पन्नाची माहिती मिळवण्यासाठी ईडीकडून लवकरच कारवाईला सुरुवात करण्यात येणार असून अभिनेत्रींच्या ताब्यात असणाऱ्या या सर्व भेटवस्तू जप्त केल्या जातील.

ईडीने ऐश्वर्या राय बच्चनची केली ६ तास चौकशी

31 डिसेंबरपर्यंत राज्यात नवी नियमावली लागू

 सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला डिसेंबर २०२० ते ऑगस्ट २०२१ दरम्यान १० कोटींहून अधिक किमतीच्या भेटवस्तू दिल्याचा संशय आहे. तर नोरा फतेहीला सुकेश चंद्रशेखरच्या पत्नीकडून बीएमडब्ल्यू गाडी भेट देण्यात आली होती. या भेटवस्तू खंडणीच्या पैशातून खरेदी करण्यात आल्या होत्या.

सुकेश चंद्रशेखरवर एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून जून २०२० ते मे २०२१ दरम्यान २०० कोटींची खंडणी वसूली केल्याचा आरोप आहे.

 नोरा फतेहीने चेन्नईमध्ये कार्यक्रम करण्याच्या मोबदल्यात देण्यात आलेली बीएमडब्ल्यू कार परत देण्याची तयारी दर्शवली आहे. तर जॅकलिनच्या वतीने देण्यात आलेले १५ लाख रुपयेही एका पटकथा लेखकाने आपण परत देण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे.

‘बजरंगी भाईजान’चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, सलमान खानने दिले संकेत

Sukesh Chandrashekhar and Jacqueline’s ‘Story’ to be on OTT? Conman’s Chats with Nora Fatehi Leaked

 सुकेशने जॅकलिनला काय भेटवस्तू दिल्या होत्या?

जॅकलिनने ईडीकडे दिलेल्या माहितीनुसार, सुकेशने तिला दोन जोड्या कानातले डायमंड, जिम वेअरसाठी गुच्ची आउटफिट्स, गुच्ची शूज, रोलेक्स घड्याळ, ५ बिर्किन बॅग, हर्मीस ब्रेसलेट आणि एलव्ही बॅग यांचा समावेश होता.

आरोपपत्रानुसार सुकेशने जॅकलिनला एक मिनी कूपर गाडीही दिली होती, जी परत केल्याचा तिने दावा केला आहे. याशिवाय सात कोटींचे दागिने, घोडा, पर्शियन मांजरीदेखील दिल्याचं सुकेशनेस सांगितलं आहे.

जॅकलिनची अमेरिकेत राहणारी बहीण आणि ऑस्ट्रेलियात राहाणाऱ्या भावालाही सुकेशने पैसे दिले होते. बहीण गेराल्डिन फर्नांडिस हिलाही आपण बीएमडब्ल्यू कार भेट दिल्याचं त्याने आधी सांगितलं होतं. पण नंतर त्याने या दाव्यावरुन माघार घेतली.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी