35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeटॉप न्यूज31 डिसेंबरपर्यंत राज्यात नवी नियमावली लागू

31 डिसेंबरपर्यंत राज्यात नवी नियमावली लागू

टीम लय भारी

मुंबई- सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा (omicron) धोका वाढला आहे. त्यामुळे काही निर्बंध असताना लोक अजूनही कोविडचे नियम पाळताना दिसत नाही. आता 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नवी नियमावली जारी केली आहे(New regulations implemented in the state Dec 31)

उद्यापासून मुंबईत नवी नियमावली लागू होणार आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमांना केवळ 50 टक्के उपस्थितीची अट ठेवण्यात आली आहे. ख्रिसमस आणि न्यू इयर पार्ट्यांसाठी हे निर्बंध आणण्यात आलेत. पार्ट्यांना केवळ 50 टक्के उपस्थिती ठेवण्यात येईल.

मुंबई महापालिका Omicron ला रोखण्यासाठी सज्ज; महापौरांनी मुंबईकरांना केलं आवाहन,म्हणाल्या…

महाराष्ट्रात 12 वर्षाची मुलगी ओमिक्रॉन पॉझिटिव्ह

मुंबईतील मॉल, हॉटेल, दुकानांमध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. सार्वजनिक कार्यक्रमात केवळ 50 टक्के उपस्थितीची अट लागू करण्यात आली आहे. मुंबईत उद्यापासून मुंबई पोलिसांनी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. मॉल, दुकानं, सार्वजनिक वाहतूक इथे केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

दरम्यान, मुंबईत 31 डिसेंबरच्या पार्ट्यांसाठी ड्रग तस्करीचे नवे फंडे दिसून येत आहेत. स्टेथोस्कोप, हेल्मेट, टायमधून तस्करी होत असल्याची बाब पुढे आली आहे. NCBच्या कारवाईत 13 कोटींचं ड्रग जप्त करण्यात आले आहे.

खबरदार: राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू

TN Beaches Closed on 31 Dec, 1 Jan to Avoid COVID Surge Amid New Year Revelry

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी