31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजमहापरिनिर्वाणदिनी मुंबईकरांनो ऑनलाईन अभिवादन करा, महापौरांचे आवाहन

महापरिनिर्वाणदिनी मुंबईकरांनो ऑनलाईन अभिवादन करा, महापौरांचे आवाहन

टीम लय भारी

मुंबई: राज्य सरकारकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने नियमावली जाहीर केली होती. येत्या ६ डिसेंबरला दादर येथील चैत्यभूमीवर जाहीर कार्यक्रम करण्यास राज्य सरकारने बंदी घातली(Mahaparinirvana Day: Greet Mumbaikars online)

तसेच सभा, संमेलन किंवा मोर्चा काढण्यास देखील राज्य सरकारने मनाई केली. दक्षिण आफ्रिकेतून पसरलेल्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाणदिनी मुंबईकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ऑनलाईन अभिवादन करा आणि बाहेरून येणाऱ्या अनुयायांना प्राधान्य द्या, असे महापौर किशोर पेडणेकर यांनी आवाहन केले आहे.

आशिष शेलार, तुम्ही गुजराती शिकून घ्या; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शेलारांना टोला!

अमृता फडणवीसांच्या आवजाची जादू पुन्हा एकदा ऐकायला मिळणार, आगामी मराठी चित्रपटासाठी गायलं गाणं!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दादर चैत्यभूमीवर केलेल्या तयारीचा आढावा देण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेली नियमावली ठरवण्यात आली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०१९साली ऑनलाईन दर्शनाची सुविधा केली गेली होती. त्यानंतर २०२०मध्ये ऑफलाईन पद्धतीने आंबेडकरांचे दर्शन देण्यास परवानगी दिली. यंदाही सर्वांना ऑफलाईन-ऑनलाईन पद्धतीने आंबेडकरांचे दर्शन घेता येणार आहे.

नवाब मलिकांची तेवढी पात्रताच नाही; बाळासाहेब थोरात संतापले

Live broadcast from Chaityabhoomi this year too, says BMC

चैत्यभूमीवर सर्वांना दर्शन दिले जाणार आहे. यावेळी सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.’
‘सध्या कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटचे संकट आले आहे. त्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मुंबईकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ऑनलाईन अभिवादन करावे आणि बाहेरून येणाऱ्या अनुयायांना प्राधान्य द्यावे.

दरम्यान महापरिनिर्वाण दिना दिवशी सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहे. पोटभरले एवढे सुकं अन्न देण्याची सुविधा करण्यात आली आहे. तसेच शौचालयाची व्यवस्था ठिकठिकाणी केली गेली आहे,’ अशी माहिती मुंबईच्या महापौरांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी