34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजनाना पटोले गरजले, OBC आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत राज्यात निवडणुका घेण्यास केला विरोध

नाना पटोले गरजले, OBC आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत राज्यात निवडणुका घेण्यास केला विरोध

संदिप रणपिसे : टीम लय भारी

मुंबई : सुप्रीम कोर्टाने ५० टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा घालून दिली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी इम्पिरिकल डेटा मागास वर्ग आयोगाकडून  प्राप्त करून घ्यावा. त्यासाठी आयोगाला लागणारी आर्थिक तरतूद करून द्यावी. प्रसंगी दोन तीन महिने निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या तर त्या पुढे ढकलाव्या परंतु ओबीसींचे राजकीय आरक्षण निश्चित झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी काँग्रेसची भूमिका असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली (Nana Patole opposes holding elections in the state till the issue of OBC reservation is resolve).

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, कुठल्याही तात्पुरत्या व्यवस्थेला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. कारण त्यामध्ये ओबीसी समाजाचे नुकसान होऊ शकते.मागासवर्गीय आयोगाची स्थापन झालेली आहेच, इम्पिरिकल डेटा प्राप्त झाला तर त्यामाध्यमातून ओबीसींची जातनिहाय जनगणनासुद्धा करुन घ्यावी.

अजित पवारांनी भाजप खासदाराची घेतली भेट

जनावरांचा चवदार चारा, तिथे शरद पवारांनी दिली भेट

जेणेकरुन केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ओबीसी समाजाला जो धोका दिला आहे त्याचे परिमार्जन महाराष्ट्रात तरी व्हावे. यातून देशभरातील ओबीसी समाजाला न्याय मिळण्याचा मार्ग उघडावा अशी विनंती वजा सुचना सरकारला केली असून सरकारही याबाबत सकारात्मक आहे असे नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणूक लढवणार

Maharashtra likely to bring amendment in laws for OBC reservation

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी