31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजआफ्रिकेतून परतलेल्या १०० प्रवाशांच्या पुन्हा चाचण्या ; ४६६ प्रवासी मुंबईत दाखल

आफ्रिकेतून परतलेल्या १०० प्रवाशांच्या पुन्हा चाचण्या ; ४६६ प्रवासी मुंबईत दाखल

टीम लय भारी

मुंबई : गेल्या १५ दिवसांमध्ये आफ्रिकेतील देशांमधून ४६६ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यापैकी १०० जण मुंबईतील असून त्यांच्या पुन्हा चाचण्या करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे(Omicron : Re-testing of 100 passengers returning to Mumbai from Africa).

मुंबईत १२ नोव्हेंबरपासून ४६६ प्रवासी आफ्रिकेतील देशांमधून आले आहेत. यातील १०० प्रवासी मुंबईतील आहेत, तर ३६६ प्रवासी मुंबईबाहेरील आहेत. मुंबईत असलेल्या १०० प्रवाशांपैकी एकालाही करोनाची बाधा झालेली नव्हती. त्यांचा विलगीकरणाचा काळही पूर्ण झालेला आहे.

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राची नवी नियमावली; 12 देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर घातली बंधने

Corona Vaccination in India: भारताचा नवा विक्रम! १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार

या प्रवाशांना विलगीकरणाच्या कालावधीत करोनाची बाधा झालेली असल्यास किंवा त्यानंतर लक्षणे दिसून आल्याची शक्यता आहे. दक्षता म्हणून यांच्या पुन्हा चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील काहींच्या चाचण्या सोमवारी केल्या आहेत. आणखी काही प्रवाशांची यादी मंगळवारी मिळणार असून या प्रवाशांच्याही चाचण्या केल्या जातील, अशी माहिती पालिकेचे सहायक आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

ठाण्यात प्रवाशांच्या अहवालाची प्रतीक्षा

ठाणे महापालिका क्षेत्रात सात जण दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करून आल्याचे समोर आले आहे. विमानतळावर करण्यात आलेल्या करोना चाचणी अहवालामध्ये त्यांना करोना नसल्याचे स्पष्ट झाले. खबरदारी म्हणून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या सात जणांचा शोध घेऊन त्यापैकी पाच जणांच्या घशातील स्रावाचे नमुने घेतले आहेत. त्याचा अहवाल दोन दिवसांत येण्याची शक्यता आहे.  या सात जणांपैकी दोन जणांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला होता, तर उर्वरित पाच जणांच्या विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झालेला नाही, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत परतलेल्या व्यक्तीला ‘ओमिक्रॉन’ करोनाचा संसर्ग? 

No case of Covid 19 Omicron reported in India so far says Health minister Mansukh Mandaviya

रुग्णसंख्या राज्यात ५३६ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात दिवसभरात ५३६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २१ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत मुंबई ११५, नगर जिल्हा ६४, पुणे जिल्हा १०३, ठाणे जिल्हा ११० नवीन रुग्ण आढळले. राज्यात ७,८५४ रुग्ण उपचाराधीन आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी