31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजVIDEO : सत्ताधारी व विरोधकांना लाज वाटायला हवी : रघुनाथदादा पाटील यांचा...

VIDEO : सत्ताधारी व विरोधकांना लाज वाटायला हवी : रघुनाथदादा पाटील यांचा घणाघात

लय भारी न्यूज नेटवर्क : राजू थोरात

तासगाव :  काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या काळात 15 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. आता भाजप – शिवसेना महायुतीच्या काळात 15,700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांना लाज वाटायला हवी, अशा शब्दांत शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी निशाणा साधला.

तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून बळिराजा पक्षाच्या वतीने बाळासाहेब पवार यांनी आज अर्ज दाखल केला. यावेळी रघुनाथदादा पाटील आवर्जून उपस्थित होते. ते म्हणाले की, 2014 च्या निवडणुकीला सामोरे जाताना नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याचा वादा मोदी यांनी केला होता. पण हे आश्वासन पाळले गेले नाही. उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. काँग्रेस – राष्ट्रवादी आणि भाजप – शिवसेना ही दोन्ही सरकारे काही उपयोगाची नाहीत. त्यामुळे बळीराजा पक्षाने निवडणुकीत आपले उमेदवार उतरविले आहेत. 200 जागांवर आम्ही निवडणुका लढवित असल्याचे रघुनाथदादा पाटील म्हणाले.

तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात कायमच दुष्काळ आहे. यातच शेतकरी संघटनेचे (रघुनाथदादा प्रणीत) बाळासाहेब पवार यांनी अर्ज भरला आहे. तासगाव तालुक्‍यातील दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून बाळासाहेब पवार यांनी साध्या पद्धतीने कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता आपला अर्ज दाखल केला. यावेळी रघुनाथदादा पाटील यांच्यासह सांगली जिल्हा अध्यक्ष अशोकराव माने व मोजके कार्यकर्ते उपस्थित होते.

बाळासाहेब पवार यांनी कायम आगळेवेगळी आंदोलने करून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. कोरड्या नदीत, कोरडया कॅनॉलमध्ये केलेली आंदोलन,  कडकनाथ कोंबडी घोटाळ्यावर केलेली आंदोलने लक्षवेधी ठरली आहेत. यावेळी उमेदवार बाळासाहेब पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी व सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे हे मोडून काढण्यासाठी माझी उमेदवारी आहे. पवार यांच्यासोबत महेश पवार, प्रदीप दरेकर, मुबारक भाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी