30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeटॉप न्यूजVIDEO : खासदार सुजय विखेंचे वादग्रस्त विधान : मोदींचे दोन हजार रुपये...

VIDEO : खासदार सुजय विखेंचे वादग्रस्त विधान : मोदींचे दोन हजार रुपये चालतात, मग कमळ का चालत नाही ?

लय भारी न्यूज नेटवर्क

जामखेड : पालकमंत्री साहेब तुमच्या तालुक्याची यादी काढा. हे जे लोक त्यांच्या (रोहित पवार यांच्या) मेळाव्यात जातात ना त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा मोदी साहेबांनी दोन दोन हजार रूपये मागच्या महिन्यात टाकलेले आहेत. मग जर तुम्हाला मोदींचे दोन हजार रूपये चालतात तर मग तुम्हाला कमळ का चालत नाही असे संतापजनक वक्तव्य खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

त्यांनी आपल्या अकलेचे तारे पुढेही तोडले आहेत. जर कमळ चालत नसेल तर काढून टाका दोन हजार रूपये. आमच्या या गरिबांना कामाला येतील. सध्या राजकीय नैतिकता मरून गेलेली आहे. वैचारिकता मरून गेलेली आहे. पाहिजे सगळं. नाही कुणालाच म्हणायचं नाही अशी सध्याची स्थिती असल्याचे ते म्हणाले. राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवारी भरण्यात आला. त्यावेळी आयोजित जाहीर सभेमध्ये सुजय विखे पाटील यांनी हे वक्तव्य केले.

केंद्र सरकारने राबविलेल्या योजनेतून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना काही रक्कम मदत म्हणून मिळाली आहे. जी अनुदान केंद्र सरकाने दिले आहे, त्या बदल्यात जनतेने भाजपला स्विकारायला हवे, अशी जबरदस्ती विखे पाटील यांनी केल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.

वाट्टेल ते बोलण्याच्या आपल्या स्वभावातून सुजय विखे यांनी काँग्रेसमध्ये असताना नरेंद्र मोदी यांच्यावरही तोफ डागली होती. त्यांनी नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेचा व्हिडीओ अजूनही सगळीकडे व्हायरल होत आहे. अशातच त्यांनी आता मोदींच्या समर्थनार्थ सामान्य जनतेला टिकेचे धनी बनविले आहे. विखेंच्या या नव्या वक्तव्यामुळे विरोधकांनाही आयतेच कोलित मिळाल्याचे बोलले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी