30 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रSwabhimani : ‘स्वाभीमानी’मधील नाराजीनाट्य पूर्वनियोजित : आ. भुयार

Swabhimani : ‘स्वाभीमानी’मधील नाराजीनाट्य पूर्वनियोजित : आ. भुयार

Byटीम लय भारी

मुंबई : पश्चिम महाराष्ट्राच्या साखरी पट्ट्यात राजकीय उपद्रवमूल्य निर्माण करणारे स्वाभिमानी (Swabhimani) शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या संभाव्य आमदारकीच्या प्रश्नावरील वादाचा धुरळा बसायला तयार नाही.

शेट्टी यांच्या विधान परिषदेच्या उमेदवारीवरून संघटनेत निर्माण झालेला वाद मिटला असून, प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक यांची नाराजी दूर झाल्याचे बोलले जाते. मात्र, संघटनेतील नाराजीनाट्य हा पूर्वनियोजित कार्यक्रम होता असा दावा शेतकरी संघटनेचे विदर्भातील आमदार देवेंद्र भुयार यांनी केला आहे.

तत्कालीन फडणवीस सरकारमधील त्यावेळचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा दणदणीत पराभव करून विजयी झालेले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला छातीवर मिरवणा-या भुयार यांनी संघटनेतील वाद हा पूर्वनियोजित नाटकाचा अंक होता, अशी टीका केली आहे.

संघटनेत मनभेद नसले तरी मतभेद असल्याची खंत भुयार यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपल्याला मंत्रिपद केवळ संघटनेतील वरिष्ठांच्या स्वाथार्पोटी मिळाले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक मंत्रिपद देण्याचे ठरवले होते. पण संघटनेच्या काही नेत्यांनी तिथे आडका ठीआणण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपणास मंत्रिपद मिळाले नाही, असे भुयार यांचे म्हणणे आहे.

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेट्टी यांचे नाव आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची बारामतीला जाऊन भेट घेतली होती. आमदारकीच्या प्रश्नावर संघटनेतील काही पदाधिका-यांची नाराजी होती. दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करून परस्परांवर अविश्वास निर्माण करणारी विधान परिषद ब्यादच आपल्याला नको, असे ते म्हणाले होते.

शेट्टी यांनी संघटनेच्या पदाधिका-यांसोबत बैठक घेतल्यानंतर हा वाद शुक्रवारी मिटला. शेतक-यांच्या व्यापक हितासाठी संघटना एकसंघ ठेवण्याचा निर्णय बैठकीत झाला. तसेच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पाटील, मादनाईक यांची नाराजी दूर झाली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी