27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeटॉप न्यूजNarendra Modi : हे कसले ५६ इंची, हे तर मुडदूस बालक...

Narendra Modi : हे कसले ५६ इंची, हे तर मुडदूस बालक…

अ‍ॅड. विश्वास काश्यप : टीम लय भारी

हे कसले ५६ इंची, हे तर मुडदूस बालक …

मा . नरेंद्रभाई मोदी साहेब ,
प्रधानमंत्री,
भारत सरकार .

महोदय,

तुमचा राजीनामा ? काहीतरीच काय ….

थोडी जरी शिल्लक असेल तर तुम्ही तात्काळ राजीनामा द्या असे आम्ही कदापि बोलणार नाही . इतक्या उचापती करून आणि महत्प्रयासाने प्राप्त केलेली खुर्ची इतक्या सहजासहजी सोडायला आपण सी . डी . देशमुख, लालबहादूर शास्त्री आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकर आहात का ?
असो .

तुमचं नशीबच मोठं….

तुमचं नशीबच मोठं हो . त्याला कोण काय करणार ? असतं एखाद्याच नशीब . आपण बऱ्याचवेळा पाहतो की, एखाद्या व्यक्तीला त्याच्या लायकी पेक्षा कितीतरी पटीने जास्त मिळते . आणि त्याला वाटते की हे सर्व माझ्या कर्तृत्वावर मिळाले आहे . असो .

देशाच्या सत्यानाशाला सुरुवात …

आपल्याला सांगतो जेव्हापासून आपण देशाचा कारभार हातात घेतलाय तेव्हापासून देशाचा सर्वच क्षेत्रात सत्यानाशच सुरू झालाय .बांगला देशाचे चलन आमच्या रुपयांपेक्षा जास्त ह्यातच सर्व सामावलेलं आहे . काय चाललंय ह्या देशात ? कसं होईल ह्या देशाचं ? काहीच समजेना . काँग्रेस , नेहरू सरकारने केलेल्या सर्व संस्था आपण विक्रीस काढीत आहात . असो .

अण्णा हजारे आणि गॅंग …..

आपण प्रधानमंत्री होण्याची सुरुवातच मस्त केलीत . पडद्याच्या मागे तुमच्या मातृसंस्थेने अशी काही चक्रे फिरविली की देशातील भल्याभल्या शहाण्यांना काहीच समजले नाही .अण्णा हजारे आणि गॅंगला मॅनेज करून देशात कधी नव्हे ती अघोषित आणीबाणीची परिस्थिती तयार करून एक माहोल तयार केला . तुमच्या उद्योगपती मित्रांचा मीडिया तुमचे पाय चाटायला तयारच होता .तो अजूनही तसाच आहे उलट त्यांचा चाटण्याचा स्पीड जास्तच वाढलाय . आतापर्यंत असे कधीच झाले नव्हते की प्रधानमंत्र्याच्या लाल किल्याच्या भाषणावर त्याच दिवशी दुपारी कोणत्या तरी राज्याच्या मुख्यमंत्र्याने जाहीरपणे सभा घेऊन टीका केली आणि ती संपूर्ण देशात मीडियाने लाईव्ह दाखविली. आपण तो पराक्रम करून दाखविलात. असो.

अण्णा हजारे नावाच्या अडाण्याने ( अदानी नव्हे ) मैं भी अण्णा तू भी अण्णा अशी मोहीम चालवून भारताचा नवीन गांधी होण्याचा केविलवाणा आणि बालिश प्रयत्न केला . कुठे ते महात्मा आणि कुठे हे झोलर ? ह्या झोलरवर पुढे कधीतरी . असो.

स्वतःचा राज्याभिषेक …..

तुम्ही तुमच्या पक्षाच्या गोवा अधिवेशनात स्वतःचा राज्याभिषेक काही मित्रांकरवी करून घेतलात . लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज ह्यांनी थोडा विरोध केला . पण काही झाले नाही . तुम्ही फिल्डिंगच अशी लावली होती की कोणाचे काहीच चालले नाही. असो.

बिचारे लालकृष्ण अडवाणी ….

आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्रा प्रकरणातील तुमच्या लीला ह्या लालकृष्णाने स्वतःच्या डोळ्याने पहिल्या होत्या . त्यावेळी प्रधानमंत्री वाजपेयी ह्यांनी आपल्याला राजधर्माची आठवण करून दिली होती .परंतु त्यावेळी अडवाणी तुमच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले . त्यामुळे तुम्ही काय करू शकता हे अडवाणींना माहीत होते . त्यामुळे ते तुमच्या नादी लागले नाही आणि पुढे कधीही लागणार नाहीत . तुम्ही त्यांना मस्तपैकी राजकीय शवागृहात नेऊन ठेवले आहे . जशी अडवाणींची अवस्था आज झाली आहे अगदी तशीच अवस्था एकदिवस अंधभक्तांची सुद्धा होणार आहे हे भक्तांनी पक्के लक्षात ठेवावे. असो.

आपण कसलेले नटसम्राट ….

तथाकथित लोकशाही पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री पदी विराजमान झाल्यावर संसदेत पहिल्यांदा पाऊल ठेवताना तुम्ही संसदेच्या पायरीवर डोके ठेवले . तुम्हाला खरे सांगतो , आमच्यासारखे असंख्य विरोधक सुद्धा काही मिनिटांसाठी तुमचे फॅन झालो . पण ते तेवढ्या मिनिटांसाठीच . कारण तेव्हापासून तुम्ही कसलेले नटसम्राट आहात ह्याचा आम्हाला आजपर्यंत अनुभवच येत आहे . संसदेच्या सेंट्रल हॉल मध्ये भाषण करताना अडवाणींचे नाव घेऊन रडलात काय , पाणी काय पिलात . असो .

भाजपा इव्हेन्ट पार्टी …..

तुमच्या भाजपा पक्षाला इव्हेन्ट करायची भारी हौस . ते कशाचाही इव्हेन्ट करतात . हळदी कुंकू ते गटारी त्यांना काहीही चालते . तुमच्या शपथविधीला सार्क संस्थेच्या राष्ट्रप्रमुखाना बोलावून तुम्ही नवीनच स्टाईल बनविली . असो .

प्रशासनावर आपली पकड….

आल्याआल्याच तुम्ही प्रशासनावर एक जरब बसविण्यास सुरुवात केलीत . गृहमंत्री राजनाथसिंह आणि त्यांच्या मुलाला केबिन मध्ये बोलावून त्यांना झाप झाप झापले . त्यांच्या मुलाने कोणत्यातरी आय पी एस च्या बदलीबाबत काहीतरी उपदव्याप केला होता म्हणे . त्या दोघांना तुम्ही तुमच्या केबिनमध्ये दम दिला परंतु तो दम बाहेर जाईल ह्याची व्यवस्था सुद्धा केलीत . एक मंत्री जीन्स पॅन्ट घालून परदेशात चालला होता . त्याला तुम्ही कोठून तरी पाहिले आणि त्याला विमानतळावरून परत बोलावून त्याला तुम्ही पॅन्ट बदलायला सांगितली . अशाप्रकारे तुम्ही कोणीतरी जेम्स बॉण्ड आहात , कोणी काहीही केले तरी ते आपल्याला लगेच समजते . अशी हवा करून टाकली . जसे तुकाराम मुंढे साहेब नवीन खात्यात आल्याआल्या एका अधिकाऱ्याला सस्पेंड करून पाच सहा जणांना नोटीस देऊन प्रशासनावरील आपली मांड मजबूत करतात तसे . आपण तसेच करायचा प्रयत्न केला . ना खाऊंगा ना खाने दुगा हा सलीम जावेद टाइप प्रसिद्ध डायलॉग चिटकवून टाकलात . असो .

करदात्यांच्या जीवावर जगभ्रमंती….

त्यानंतर लगेचच तुम्ही जग भ्रमंतीवर निघालात सुद्धा . वास्को दि गामा सुद्धा लाजेल अशा पद्धतीने तुम्ही प्रवासाला सुरुवात केली . आमच्या करदात्यांच्या पैशावर तुम्ही सगळं जग फिरायला लागलात . आमच्या पैश्यावर . तुमच्या त्या पाळलेल्या अर्णब गोस्वामीला सांगा काहीतरी . तो त्याच्या चिनपाट कार्यक्रमात जे. एन. यु .च्या विद्यार्थ्यांना माजुरड्यापणे सांगतो की , त्याने भरलेल्या कराच्या पैश्यावर तुम्ही विद्यार्थी शिक्षण घेत आहात . त्या बिनडोक मूर्खाला सांगा , बाबा असे बोलू नकोस नाहीतर माझे परदेशी जाणे बंद व्हायचे . असो .

मोदी – मोदी – मोदी …..

तुम्ही प्रधानमंत्री झाल्यावर देशातील इतर राज्यांच्या निवडणुका होत होत्या . तुम्ही त्या त्या राज्यात जाऊन निवडणुकीचा प्रचार करीत होतात . तो प्रचार संपला की तुम्ही पुन्हा एकदा जग भ्रमंतीवर . तुमचे लक्षच नव्हते देशाकडे . तुम्ही फक्त जगाचा नकाशा पाहत बसायचे . आता कुठे ? बाहेरच्या जगात तुमचे साचेबद्ध पद्धतीने ठरविलेले इव्हेन्ट / स्वागत व्हायचे . तेथील गुजराती, मारवाडी , एन . आर. आय .हे मोठमोठ्याने ” मोदी मोदी ” करीत माकडउडया मारायचे . आणि इथला मीडिया ते मोठे चवीने दाखवायचा . असो .

नवीन राजकारण .. विरोधी पक्ष विकत घेणे …..

हळू हळू भारतातील सर्व राज्यांच्या निवडणुका झाल्या . एक दोन राज्य सोडून सर्व भारत भाजपाचाच झाला. ज्या ठिकाणी काहीच होण्याची शक्यता नव्हती तिथे समोरचा सगळा विरोधी पक्षच विकत घेऊन त्याला भाजपाचा शिक्का मारलात . अशारितीने सर्व भारत तुम्ही भगवामय करून टाकलात . असो .

भाजपा पक्ष कार्यालय …..

हे होत असताना तुम्ही राजधानीत भाजपाचे मोठे आलिशान सेवेन स्टार पक्ष कार्यालय बांधले . इतके पैसे कोठून आले हे विचारणे म्हणजे मूर्खपणाचे होते . त्यामुळे ती मूर्खपणा कोणीच केला नाही . असो .

ऐतिहासिक नोटबंदी ……

आपल्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या निवडणूक होत्या त्या म्हणजे उत्तरप्रदेश आणि बिहार ह्या राज्यांच्या .त्या तुम्हाला येनकेन प्रकारे जिंकायच्याच होत्या . परंतु ते अशक्य होते . मग तुम्ही तुमचे ब्रह्मास्त्र बाहेर काढले . नोटबंदी ! जेणेकरून काँग्रेस, बसपा , सपा आणि इतर पक्षांकडे पैसेच राहणार नाहीत . नोटबंदी करतेवेळी तुम्ही त्याला फार मोठा तात्विक मुलामा दिला . भ्रष्टाचार समूळ नष्ट होण्याचा वगैरे वगैरे . आणि हो पन्नास दिवसात नोटबंदी फेल झाली तर रस्त्यात उभे करून मला चाबकाचे फटके मारा असे सुद्धा तुम्ही मानभावीपणे म्हणालात . तुमच्या त्या एका निर्णयामुळे संपूर्ण देशाची वाट लागली . अर्थव्यवस्था डुबायला लागली . सगळे भिकेला लागले . कित्येक जण लायनीत उभे राहून मृत्युमुखी पडले . त्याकाळी तुम्ही तुमच्या मातोश्रीना सुद्धा लायनीत उभे केले . असो .

आपले मातृप्रेम ..????

तुमचं बरं आहे . तुम्ही घरी आईला भेटायला जाता . घरातून आईला बाहेर काढता . फोटो सेशन करून त्या माउलीला पुन्हा घरात नेऊन सोडता आणि निघून जाता . किती हे मातृप्रेम . तुम्ही फक्त एकदाच एक दोन दिवसासाठी दिल्लीत आपल्या प्रधानमंत्र्याच्या निवासस्थानी त्या माउलीला घेऊन गेला होता . तिथेही फोटो सेशन झाले . का हो तुम्हाला आई जड होते का बंगल्यात ठेवायला ? आता तुमचा चहाचा पण व्यवसाय नाही की बाबा काही पैश्याचा प्रॉब्लेम आहे म्हणायला . पत्नी बद्दल काही बोलायलाच नको . मुस्लिम स्त्रियांच्या तलाक बाबत अति संवेदनशील असलेले आपण……..!
नोटबंदी मुळे उत्तरप्रदेश, बिहारच्या निवडणुका तुम्ही सहज जिंकलात . सोबत इ व्ही एम मशीन होतीच . असो .

शॉर्टकट ट्वेंटी ट्वेंटी मॅच ….

त्यानंतर काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका लागल्या . आम्हाला खात्री होती की तुम्ही पाकिस्तान विरोधात युद्ध पुकारून पाकिस्तानला नेस्तनाबूत कराल आणि त्याच भावनिक वातावरणात तुम्ही निवडणुकीला सामोरे जाल . परंतु तुम्ही तसे न करता संशयास्पद पुलवामा आणि सर्जिकल स्ट्राईक ( जे काँग्रेस ने बऱ्याच वेळा केले होते परंतु त्यांनी त्याचा कधीही गाजावाजा केला नाही ) अशा शॉर्टकट २०-२० पद्धतीची लुटुपुटूची लढाई करून दाखविली . आणि लोकसभेची निवडणूक जिंकली . निवडणुकीच्या आधी ठरवून सांगितल्यानुसार सीटा सुद्धा जिंकून आणल्या आपण . ह्यावेळी मात्र प्रचंड पैसा असलेला भाजपा पक्ष आणि कंगाल असलेला विरोधी पक्ष असा सामना होता . आणि हो त्या इ . व्ही .एम . ला विसरलोच . सॉरी . असो .

कलम ३७० …अदानी अंबानी व्याप्त काश्मीर ???

निवडून आल्यानंतर तो काश्मीरचा मुद्दा बाहेर काढलात . कलम ३७० वगैरे . काश्मीर मुक्त झाल्यामुळे आम्हाला वाटले नवीन कायद्यानुसार आम्हालासुद्धा तिथे जागा विकत घ्यायला मिळणार . परंतु नंतर लक्षात आले की त्यासाठी तुमचे पार्टनर अदानी, अंबानी आहेतच की . आम्ही लगेचच जमीन विकत घेण्याचा विचार बदलला . म्हटलं घेऊ दे ह्यांनाच . ते नवीन काश्मीर तयार करतील . पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या अर्ध्या काश्मीरला आपण नाही का पाकव्याप्त काश्मीर म्हणतो . तसेच ह्यापुढे आपण अदानी अंबानी व्याप्त काश्मीर असे म्हणू हवे तर . असो .

हुकूमशाहीचे काऊंट डाऊन सुरू ….

आता मात्र हळूहळू तु%A

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी