31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजमहिलांवरील अत्याचार रोखण्याबाबत विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे हि राज्यपालांची सूचना...

महिलांवरील अत्याचार रोखण्याबाबत विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे हि राज्यपालांची सूचना योग्य : रामदास आठवले

मुंबई : महाराष्ट्रात  महिला अत्याचार  प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजित करून महिला अत्याचार रोखण्याबाबत चर्चा करण्याची महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सूचना केली आहे. ही सूचना अत्यंत योग्य असून राज्यातील जनतेच्या मनातील मागणी राज्यपालांनी पत्र लिहून मुखमंत्र्यांना सूचित केली आहे. या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून  राज्यसरकारने त्वरित महिला अत्याचार प्रश्नावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बिलाविले पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास  आठवले यांनी केली आहे (Ramdas Athawale : Governor’s suggestion to hold special session of Maharashtra Legislature on women’s atrocities issue correct).

‘कारवाई करता येत नसेल, तर आम्ही त्याचा चौरंग करतो’, मुंबईतील पाशवी बलात्कार प्रकरणी मनसेने व्यक्त केला संताप

उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घ्यावे, आणी अडीच वर्षांचे मुख्यमंत्री पद दयावे : रामदास आठवले

मुंबईत नुकताच साकिनाका येथे एका महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्याचा अमानुष प्रकार घडला होता. त्या पार्श्वभूमीवर महिला अत्याचार प्रश्नावर  विधिमंडळाचे विशेष बोलविण्याची राज्यपालांची सूचना अत्यंत योग्य आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाजपशासित राज्यांनी  अधिवेशन बोलवावे अशी मागणी केली आहे. महाराष्ट्राचे अधिवेशन घेण्याबाबतचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याने महिला अत्याचार रोखण्याबाबत च्या संवेदनशील विषयावर मुख्यमंत्र्यांनी तत्परता दाखवावी. महिला अधिकाराबाबत फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र  नेहमीच अग्रेसर राहिला आहे. तो परंपरा जोपासत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  महिलांवरील  अत्याचार रोखण्याबाबत विधीमंडळाचे  विशेष अधिवेशन बोलवावे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी आज मुंबईत केले आहे (Ramdas Athawale has appealed to mumbai today to convene a special session of the legislature to curb atrocities against women).

प्रकाश आंबेडकरांना कोरोना लस देण्यास रामदास आठवले यांचा विरोध

Ramdas Athawale meets Payal Ghosh, seeks police protection for actress | Celebrities News – India TV (indiatvnews.com)

साकीनाका खैरानी रोड येथील परिसरात ३२ वर्षाच्या महिलेवर निर्दयीपणे पाशवी बलात्कार करण्यात आला. अमानुषपणे मारहाण केल्यामुळे तिच्या गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्या होत्या. याच जखमांमुळे या अबलेची मृत्यूशी ३३ तास झुंज अपयशी ठरली. तिची हत्त्या करणाऱ्या क्रूरकर्मी व्यक्तीचे नाव मोहन चौहान आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशातील जौनपूरचा राहणारा आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी