33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजअमरावतीत आमदार रवी राणांसह 11 जणांवर गुन्हा दाखल

अमरावतीत आमदार रवी राणांसह 11 जणांवर गुन्हा दाखल

टीम लय भारी

अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अमरावतीमध्ये वाद पुन्हा पेटला आहे. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी रवी राणा यांनी काही दिवसापूर्वी महापालिकेत केली होती.अमरावती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणावरून अमरावती महानगर पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार काल घडला आहे. काल झालेल्या शाईफेकीच्या विरोधात आज अग्निशमन दल वगळता सर्व कार्यालयांमध्ये कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे(Ravi Rana, a case has been registered charged with attempted murder).

या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत ५ जणांना अटक केली आहे. शाईफेक प्रकरणात आमदार रवी राणांवर गु्हा दाखल करण्यात आला आहे. रवी राणा आणि अन्य 11 आरोपींवर कलम 307 नुसार हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप ठेवण्यात आलाय.

अमरावतीमध्ये असलेल्या राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा महानगरपालिकेने हटवला. त्यानंतर अमरावतीत पुतळा हटवू नये अशी मागणी करतात काही संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी रवी राणा, नवणीत राणा हे आघाडीवर होते. मनपा आयुक्त आष्टीकर हे बुधवारी दुपारी त्यांच्या अंगरक्षक पोलीस कर्मचारी आणि मनपा अधिकारीसह उड्डाणपुलाखाली दाखल झाले. त्यावेळी दोन महिला आणि काही शिवप्रेमी दाखल होऊन काहीच वेळात आष्टीकर यांना पकडून त्यांच्या अंगावर काळी शाई फेकली. या झटापटीतून आष्टीकर यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा त्यांचा पाठलाग करून त्यांची कॉलर पकडून दोन महिलांनी शाई फेकून त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या, त्यानंतर त्यांनी त्याठिकाणाहून पळ काढला.

हे सुद्धा वाचा

नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना धमक्यांसहित फुकट सल्ले

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना नोटीस; साक्ष नोंदवण्यासाठी राहावे लागणार उपस्थित!

शेतकरी जोडप्याला मारहाण करणाऱ्या ‘या’ राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल!

Women throw ink at Amravati civic chief

अमरावती येथील आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार रवी राणा आणि खासदार नवणीत राणा यांनी प्रतिक्रीया दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढल्यामुळे संतापलेल्या शिवप्रेमींनी शाईफेक केली, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आपण दिल्लीला असल्याचे रवी राणा यांनी सांगितले. तर आमदार नवणीत राणा यांनी हा शिवप्रेमींचा राग असल्याचे म्हटले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी