33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजपुतण्या रोहितची काका अजितदादाला साद : परत या, परत या

पुतण्या रोहितची काका अजितदादाला साद : परत या, परत या

सत्तार शेख | लय भारी न्यूज नेटवर्क

जामखेड: महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असे असतानाच अचानक झालेल्या राजकीय घडामोडीत शनिवारी भाजपा व अजित पवार गट मिळून सत्तास्थापनेचा दावा करत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीही उरकण्यात आला अन देशासह राज्यात मोठा राजकीय भूकंप घडला. दरम्यान राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या समवेत शपथविधीसाठी गेलेल्या आमदारांना पक्षाने पुन्हा आपल्या बाजुला वळवण्याचे यशस्वी प्रयत्न केले. अन शनिवारची रात्र सुरू होण्यापुर्वी अजित पवार एकाकी पडले. दरम्यान अजित पवारांचे मन वळवण्यासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पवार कुटूंबातील सदस्यांचाही अजित पवारांच्या बंडाला विरोध होऊ लागला आहे. अजित पवारांचे पुतणे तथा कर्जत – जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांनी काका अजितदादांनी पवार साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं असं मनापासून वाटतं अशी फेसबुक पोस्ट करत काकांनी परत स्वगृही येण्याची साद घातली आहे.

आमदार रोहितदादा पवार आपल्या फेसबुकपोस्टमध्ये म्हणतात की, लहानपणापासून साहेबांना पहात आलो, प्रश्न राजकीय असो की कौंटुबिक साहेब कधी खचून जात नाहीत. माझे आजोबा अप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडील राजेंद्र दादांना धीर देणारे साहेब मी पाहिले आहेत आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार गेल्यानंतर अजितदादांना सावरणारे देखील साहेबच होते. अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमीका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकिय खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही.

सध्याच्या राजकीय घडामोडीत निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करताना रोहित पवार म्हणतात आजच्या घडामोडी पाहताना जूनं चित्र कायम तसच असावं. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं असं मनापासून वाटतं.साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणार देखील नाहीत, पण कुठेतरी सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती “पवार साहेब” होतो. सर्वसामान्यांच्या आवाज होतो व अखेरपर्यन्त लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पहात आहेत अशा वेळी कुटूंबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असं वाटतं की आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत रहायला हवं असे सांगत लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत असं व्यक्तिश: वाटतं असे आमदार रोहितदादा पवार यानी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावनांना मोकळी वाट करून देत काका अजितदादांनी पुन्हा स्वगृही परतावं अशी साद घातली आहे. सदर फेसबुक पोस्टला रोहितदादांनी एक फोटो जोडलेला आहे या फोटोत पवार साहेबांसोबत अजितदादा, सुप्रियाताई व स्वता: रोहितदादा दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

चोरून केलेलं काम कोणतं, हे शिवसेनेनं आम्हाला शिकवू नये : आशिष शेलार

न्यायालयाची टिप्पणी : अशा पद्धतीने राज्यपाल कुणालाही शपथविधीसाठी निमंत्रण देऊ शकत नाहीत.

राष्ट्रवादी आमदारांच्या हॉटेलमध्ये भाजपचे नेते, शरद पवारांचीही भाजपच्या खासदारांनी घेतली भेट

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी