31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजपुणे जिल्ह्यात एकादिवशी लाखोहून अधिक सातबारे वाटप

पुणे जिल्ह्यात एकादिवशी लाखोहून अधिक सातबारे वाटप

टीम लय भारी

पुणे : 1 सप्टेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील शेतकऱ्यांना मोफत सुधारित सातबारा 7/12 वाटप करण्याची योजना जाहीर केली आहे.पुणे येथे महाराष्ट्र शासनाच्या महसुल विभाग व वनविभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त राज्य शासनाने  8 डिसेंबर (7/12 ) रोजी लाखो मोफत सातबारा वितरण करण्यात आले(Satbaara distributed More than lakhs in one day). 

कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्याने मागील महिन्यात झालेल्या फेरफार अदालतीमध्ये 3 हजार 369 इतक्या नोंदी निर्गत झालेल्या आहेत. जिल्ह्यात 2 ऑक्टोबरपासून  93 टक्के खातेदारांना 7/12 वितरण करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील 369 गावात एकाच दिवशी 1 लाख 24 मोफत सातबारा वितरण करण्यात आले.

शाळा सुरु करण्याचा निर्णय 15 डिसेंबरला राज्यस्तरावर घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

आम्ही दोनशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना घालवलं, तुम्ही कोण?; कन्हैया कुमारचा पंतप्रधानांवर निशाणा

जिल्ह्यात 6 डिसेंबरपर्यंत मुदत पूर्ण झालेल्या 11 हजार 789 नोंदी प्रलंबित असून नोंदीमध्ये प्रामुख्याने साध्या / वारस / तक्रार व मुदत पूर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी निर्गती करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळकायदा शाखेकडून संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

मंगळवारी आयोजित विशेष मोहिमेत तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी सजांच्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांना ऑनलाईन ७/१२ घेण्याबाबत मार्गदर्शन केले.  फेरफार अदालतीमध्ये फेरफार नोंदी प्रलंबित असलेल्या व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून मंडळ अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध करून द्यावीत आणि आपल्या नोंदी निर्गत करून घ्याव्यात.

अजित पवारांनी बूस्टर डोससंबधी मांडली भूमिका; म्हणाले “दोन्ही डोस घेऊनही बाधा झाली आहे, तर…

Maharashtra slashes excise duty on liquor; check new prices here

सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची आणि तलाठ्याची वाट पाहण्याची आता गरज नाही, शेतक-यांना तलाठी यांच्या सहीचा ऑनलाईन सातबारा उतारा मिळू शकतो तसेच पिकपाणीही अॅपद्वारे करू शकतात.जिल्ह्यात ई-पीक पाहणी ॲपद्वारे 4 लाख 30 हजार शेतकऱ्यांनी पीकपाहणीची नोंदणी केली आहे. ही सुविधा https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 15 रुपये शुल्क ऑनलाईन अदा करून अधिकाधिक शेतकऱ्यांनी हवे असलेले 7/12 डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी