31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजशरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर पाहायला बाळासाहेब ठाकरे हवे होते

शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर पाहायला बाळासाहेब ठाकरे हवे होते

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावावर ‘महाविकास आघाडी’तील सर्व पक्षांनी आज शिक्कामोर्तब केले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना पवार यांनी बाळासाहेबांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर पाहायला बाळासाहेब ठाकरे हवे होते
सर्व आमदारांमा मार्गदर्शन करताना शरद पवार

शरद पवार म्हणाले की, आज बाळासाहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. बाळासाहेब ठाकरे व जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी माझे व्यक्तीगत संबंध फार चांगले होते. आम्ही एकत्र येत असल्याचे पाहून बाळासाहेबांना खूप आनंद झाला असता. जाहीर व्यासपीठावर बाळासाहेबांनी माझ्यावर टीका करताना भरपूर शब्द वापरले. पण त्यांनी व्यक्तीगत सलोखा सोडला नाही. आम्ही जाहीर सभेत एकमेकांचा समाचार घ्यायचो. पण त्याच दिवशी जेवायला मिनाताईंकडे जायचो. या देशात अनेक नेते मोठे आहेत. ज्यांनी अनेकांना घडवले. यात बाळासाहेबांचाही समावेश आहे. चंद्रकांत खैरेंसारख्या सामान्य व्यक्तीला त्यांनी मोठे बनविले. दत्ता नलावडेंसारख्यांना बाळासाहेबांच्या व्यापक दृष्टीने घडविले. ती दृष्टी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घडेल. महाराष्ट्राचा कारभार योग्य दिशेने चालविण्याची जबाबदारी आम्ही उद्धव ठाकरे यांच्यावर सोपविली आहे. मी पंतप्रधानांना व गृहमंत्र्यांना विनम्रतेने सांगितले होते. देशात वेगवेगळ्या भाषा, धर्म, जाती असतात. देशाचे नेतृत्व करणारे तुम्ही आहात. महाराष्ट्र हा एक महत्वाचा घटक आहे. केंद्र व राज्य सरकार वेगळे असेल तर विकास होत नाही असे म्हटले जाते. पण चिंता करण्याचे कारण नाही, असा दिलासा त्यांनी दिला.

शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर पाहायला बाळासाहेब ठाकरे हवे होते
उद्धव ठाकरे यांचे आभार मानताना खासदार संजय राऊत

येत्या १ डिसेंबर रोजी शिवतिर्थावर होणार शपथविधी

शरद पवार म्हणाले की, उद्या सकाळी ८ ते ५ या वेळेत शपथ होईल. त्यानंतर काही काळ विश्रांती होईल. पुन्हा मंत्रीमंडळाच्या बाबतीत काही निर्णय घेतले जातील. तिथूनच तिन्ही पक्षांचे नेते राज्यपालांकडे जातील. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्याबाबत राज्यपालांना माहिती दिली जाईल. नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी येत्या १ तारखेला शिवतीर्थावर होईल, असे सांगतानाच शिवतीर्थाची जागा पुरेल का अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. हा केवळ शपथविधीचा हा सोहळा नसेल तर सामान्य लोकांच्या जिवनांत सोहळा साजरा करण्याची परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार करेल, असा आशावादही पवार यांनी व्यक्त केली.

शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर पाहायला बाळासाहेब ठाकरे हवे होते
मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव जाहीर झाले तेव्हा रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते

 

हे सुद्धा वाचा

शरद पवारांनी शिवसेना स्टाईलमध्ये दिला ‘हा’ आदेश

…अन् भाजपच्या नेत्यांचे चेहरे उतरले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही राजीनामा, शिवसेनेवर डागली पुन्हा तोफ

राजकीय भूकंप : अजित पवार यांनी राजीनामा दिला, प्रतिभाताई पवार यांच्यामुळे अजितदादांची माघार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी